कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुदत; केंद्राचे आदेश 

महेंद्र महाजन
Friday, 30 October 2020

किरकोळ व्यापाऱ्यांसाठी दोन टन आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टनाची साठवणूक मर्यादा केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात घातली होती. तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी पटकन पाठवून देण्याचे दबावतंत्र वापरल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती.

नाशिक : कांद्याच्या साठवणुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधानंतर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न-नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यात शिथिलता आणली. कांद्याची खरेदी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी केंद्र सरकारने दिला आहे.

दबावतंत्र वापरल्याची व्यापाऱ्यांची तक्रार

व्यापाऱ्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडताना खरेदी केलेला कांदा पाठवण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो, असे सांगितले होते. लिलाव सुरळीत होऊन कांदा व्यापाऱ्यांना काम करता यावे यादृष्टीने केंद्राने निर्णय घेतल्याचे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी दोन टन आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टनाची साठवणूक मर्यादा केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात घातली होती. तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी पटकन पाठवून देण्याचे दबावतंत्र वापरल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

राज्य व संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश

अखेर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या तयार झालेल्या अडचणींच्या अनुषंगाने विचारविनिमय करून खरेदीनंतर तीन दिवसांचा कालावधी दिला. ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक सीताराम मिणा यांनी कांदा साठवणूक निर्बंधातील दुरुस्तीचे आदेश जारी केले आहेत. देशातील राज्य व संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना हे आदेश पाठवण्यात आले आहेत.  

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders three days Duration purchase of onion nashik marathi news