चाकरमानी आनंदी! रेल्वेगाडी सुरू होत असल्याने अप-डाउन प्रवाशांची होणार सोय 

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Monday, 7 September 2020

मध्य रेल्वेने शनिवार (ता. १२)पासून रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने, रोज मुंबईला अप-डाउन करीत प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल सहा महिन्यांपासून 
लॉकडाउनमुळे रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेच्या चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय सुरू आहे. 

नाशिक रोड : मध्य रेल्वेने शनिवार (ता. १२)पासून रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने, रोज मुंबईला अप-डाउन करीत प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल सहा महिन्यांपासून 
लॉकडाउनमुळे रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेच्या चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय सुरू आहे. 

सहा महिन्यांनंतर अप-डाउन प्रवाशांची होणार सोय 

येत्या १२ सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने गाड्या सुरू केल्या आहेत, मात्र त्यात पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार का, हा प्रश्‍न मात्र कायम आहे. रेल्वेने पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेत नवीन गाडी सुरू केली आहे. जी गाडी सुरू केली आहे तिचे सगळे नियोजन पंचवटी एक्स्प्रेसचे आहे. पण तिचा क्रमांक मात्र पंचवटीचा नाही. त्यामुळे पंचवटी सुरू होणार का याविषयी उत्सुकता कायम आहे. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर नाशिककरांची प्रवास वाहिनी प्रमुख एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने चाकरमान्यांमध्ये आनंद आहे. नियमित पासधारकांची पाससाठी धावाधाव सुरू झाली आहे.

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

रेल्वेगाडी सुरू होत असल्याने चाकरमानी आनंदी 

रेल्वेने गाड्या सुरू करताना बदल केले तसे आरक्षण प्रक्रियेत बदल होणार का याविषयी उत्सुकता आहे. रोज मनमाड ते मुंबई जवळपास दीड हजार प्रवासी प्रवास करतात. यात नोकरीला असणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सहा महिन्यांपासून रेल्वे बंद असल्याने रस्त्याने प्रवास सुरू आहे. प्रवासाला तिपटीने पैसे खर्च व्हायचे, शारीरिक त्रासही व्हायचा. मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय असल्यामुळे नवी गाडी सुरू होण्याने उत्साह आहे. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

रेल्वेने लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पास काढलेल्या चाकरमान्यांसाठी काही सवलत द्यायला हवी. -गुरमितसिंग रावल (रेल्वे प्रवासी संघटना)  
 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: travelers happy as the train starts nashik marathi news