"आदिवासी' मेगा नोकरभरती प्रकरण : सायबर पोलिसांची विशेष पथके रवाना 

fake site tribal.jpg
fake site tribal.jpg

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळावर मेगा नोकरभरतीची जाहिरात करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी संशयितांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. 

तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू 
आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त अविनाश अशोक चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या mahatribal.webs.com या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करण्यात येऊन बनावट संकेतस्थळावर तीन हजार 199 जागांसाठीची मेगा नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क ऑनलाइन मागविण्यात आलेले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव याअंतर्गत भरती असून, मुंबईसाठी एक हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त अविनाश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक माहितीच्या आधारे महत्त्वाची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार विशेष पथके तयार करून ती संशयितांच्या शोधार्थ रवना झाली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या संकेतस्थळासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आणि संशयितापर्यंत सायबर पोलिस पोचतील, असे तपासी अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com