नाकाबंदी अन् गस्ती असूनही 'त्यांनी' असा प्रकार केलाच कसा? पोलीसही संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 29 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सर्वत्र लॉकडाउन आहे. अशातच नाकाबंदी अन् गस्ती असूनही 'त्यांनी' असा प्रकार केलाच कसा? असा प्रश्न सर्वांना पडला असून पोलीस अन् नागरिकही संभ्रमात आहेत.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सर्वत्र लॉकडाउन आहे. अशातच नाकाबंदी अन् गस्ती असूनही 'त्यांनी' असा प्रकार केलाच कसा? असा प्रश्न सर्वांना पडला असून पोलीस अन् नागरिकही संभ्रमात आहेत.

असा घडला प्रकार
अंबड लिंक रोड परिसरातील कामटवाडेत प्रभाकर थोरे (रा. बंगला क्रमांक 14, धन्वंतरी मेडिकल कॉलेजसमार) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. 27) मध्यरात्री चोरट्यांनी थोरे यांच्या बंगल्याच्या खिडकीची मच्छर जाळी कापून हात घालून टेबलावर ठेवलेला मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे 68 हजारांचा ऐवज चोरला. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना पळसे कारखाना कॉलनीत घडली. शिला गायधनी (रा. जुना कारखाना रोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. 24) कारखाना कॉलनीतील बंद अंगणवाडीचा दरवाजा तोडून अंगणवाडीतील पोषण आहाराचे साहित्य तसेच इलेक्‍ट्रिक वजनकाटा, विद्यार्थ्यांना बसण्याची सतरंजी असा सुमारे 16 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज नेला. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

85 हजारांचा ऐवज लंपास
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सर्वत्र लॉकडाउन असतानाही चोरट्यांनी दोन घरफोड्या करीत 85 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे दिवसरात्र रस्त्यावर फक्त पोलिसांची नाकाबंदी आणि गस्ती असतानाही चोरट्यांनी घरफोडी केलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two burglaries in the lockdown period at nashik crime marathi news