मनरेगाचा 'इथल्या' दोन लाख १६ हजार कुटुंबीयांना रोजगार; वाचा सविस्तर

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Sunday, 13 September 2020

एका बाजूला लॉकडाउनच्या काळात बेरोजगारीची ओरड होताना शासनाच्या माध्यमातून अकुशल कामगारांसाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये ५० लाख ५८ हजार २५२ लोकांना रोजगार निर्माण झाल्यामुळे काही दिवस का होईना पोटाची खळगी भरण्यास मदत झाली आहे. 

नाशिक : (नाशिक रोड) उत्तर महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या पाच महिन्यांत शासनाच्या माध्यमातून दोन लाख १६ हजार २७ कुटुंबीयांना रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध झाला आहे. एका बाजूला लॉकडाउनच्या काळात बेरोजगारीची ओरड होताना शासनाच्या माध्यमातून अकुशल कामगारांसाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये ५० लाख ५८ हजार २५२ लोकांना रोजगार निर्माण झाल्यामुळे काही दिवस का होईना पोटाची खळगी भरण्यास मदत झाली आहे. 

राज्यात दहा लाख ७१ हजार ३१८ कुटुंबीयांना रोजगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासन प्रतिकुटुंब १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते व प्रतिकुटुंब १०० दिवसांच्या मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. लॉकडाउनच्या काळात बेरोजगारीची समस्या पाहायला मिळत असताना शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मुबलक रोजगाराची उपलब्धता झाली असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. राज्यात दहा लाख ७१ हजार ३१८ कुटुंबीयांना १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२० यादरम्यान रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातल्या अकुशल कामगारांना कमीत कमी वर्षातून शंभर दिवस रोजगाराची हमी देते. ग्रामीण भागात किमान पोटाची खळगी भरली जावी, यासाठी हा रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

रोजगारप्राप्त कुटुंबांची संख्या
 
नाशिक : ५१,४८३ 
नगर :३१,५३२ 
धुळे : २४, ०१९ 
नंदुरबार : ८१, ७३५ 
जळगाव : २७,२५८ 
एकूण : २, १६, ०२७  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh 16 thousand of MGNREGA Employment for families in North Maharashtra nashik marathi news