अखेर खुलासा झालाच! सराफी पेढीत चोर महिलेचा कारनामा CCTV फुटेजमध्ये कैद; पाहा व्हिडिओ

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 30 October 2020

सायंकाळी कर्मचारी दुकानाचा माल मोजत असताना एक साखळी कमी असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यालाही धक्का बसला

नाशिक रोड : सायंकाळी कर्मचारी दुकानाचा माल मोजत असताना एक साखळी कमी असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यालाही धक्का बसला. काय घडले नेमके वाचा...

सराफी पेढीत चोर महिलेचा कारनामा! 

जुन्या आशीर्वाद बसथांबा येथील अष्टेकर ज्वेलर्सचे संचालक सुशील सुरेश शहाणे यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (ता. २७) दुपारी चारला सुनीता शिंदे यांच्यासोबत एक महिला व एक पुरुष दुकानात सोनसाखळी खरेदीसाठी आले. विक्री प्रतिनिधी निकिता पवार यांना शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने जादा वजनाची सोनसाखळी घ्यायची आहे, असे सांगितले. निकिताने सोनसाखळ्या दाखविल्या. संशयित महिलांसोबत असलेल्या राहुल गायकवाडने निकिताकडे येऊन तिचे लक्ष विचलित केले. निकिता त्याच्याशी बोलत असताना सुनीता शिंदेने ट्रेमधील चार तोळ्यांची दोन लाखांची सोनसाखळी चोरली.

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

सीसीटीव्ही फुटेजने झाला खुलासा

सुनीता शिंदेसोबतची महिला व पुरुष काही न खरेदी करता निघून गेले. सायंकाळी कर्मचारी दुकानाचा माल मोजत असताना एक साखळी कमी असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुनीता शिंदेने ट्रेमधील साखळी चोरल्याचे दिसले. नाशिक-पुणे महामार्गावर अष्टेकर ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदीसाठी आलेल्या महिलेने दोन लाखांची चार तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakhs gold chain theft from Jewelers nashik marathi news