वीजपुरवठा खंडितच्या वादातून दोघांना मारहाण; गुन्हा दाखल 

प्रमोद सावंत
Saturday, 5 September 2020

माझ्या घराचा वीजपुरवठा खंडित का केला? अशी कुरापत काढून खासगी एमपीएसएल कंपनीचे वायरमन जमील अहमद इस्माईल व कमलेश कुमार या दोघांना मारहाण करून त्यांच्यावर कटरने वार करण्यात आले.

नाशिक / मालेगाव : शहरातील दरेगाव, देवीचा मळा परिसरातील वीजवाहिनीवर आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांची वीज खंडित केली. त्याचा राग आल्याने व माझ्या घराचा वीजपुरवठा खंडित का केला? अशी कुरापत काढून खासगी एमपीएसएल कंपनीचे वायरमन जमील अहमद इस्माईल व कमलेश कुमार या दोघांना मारहाण करून त्यांच्यावर कटरने वार करण्यात आले. देवीचा मळा भागातील हॉटेलवर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल

जमील अहमद यांनी इम्तियाज अब्दुल रज्जाक याने विजेची वायर का कापली, अशी कुरापत काढून मारहाण, शिवीगाळ व ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

कंपनीतून लाखाचा ऐवज लंपास 

शहराजवळील माल्हणगाव शिवारातील सुमित इलेक्ट्रिकल्स कंपनी कारखान्याच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तांब्याचे भंगार, तांब्याची वायर असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला. सुमित इलेक्ट्रिकल्सचे संचालक विजय भावसार (रा. मोहाडी, धुळे) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. २ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ सप्टेंबर पहाटेच्यादरम्यान ही घरफोडी झाली. चोरट्यांनी कारखान्यातील १५ हजारांचे ५० किलोचे तांब्याचे स्क्रॅब, ८३ हजार ४०० रुपये किमतीच्या तब्बल ३०० किलो एलव्ही, एचव्ही व केव्ही तांब्याचे २४ नग असा एकूण ९८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविला.  

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two people beaten nashik marathi news