शिवजयंतीच्या दिवशी पोलिसांवर दगडफेक; तीन पोलिस जखमी

वाल्मिक शिरसाट
Saturday, 20 February 2021

शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी काल (ता.१९) परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केली.

देवळालीत समाजकंटकांचे दहशत दगडफेकीत दोन पोलिस जखमी

देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी काल (ता.१९) रोजी येथील त्रिमूर्ती चौक परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याने यामध्ये पोलीस शिपाई मनोहर साळुंखे तर पोलीस नाईक हे गंभीर जखमी झाली असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहे.

डोक्याला टाके पडले

याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराज शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हदीत कर्तव्य करीत असताना संसरी येथील चारणवाडी येथील एका इसमा बरोबर भांडण होऊन ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता चारणवाडी येथील सोनू जाधव हा हातात दगड घेऊन येत अमोल जाधव यास म्हणाला की फिर्यादी पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल असे सांगितले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली दगड डोक्यास लागल्याने पोलीस नाईक आहेर यांसह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुनील उपचारानंतर रुग्णालयात दाखल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

उपचारानंतर रुग्णालयात दाखल

या पूर्वी या समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा बळाचा वापर करत गर्दी पांगवावी लागली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख व सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते प्रकाश गीते यांनी शहरात बंदोबस्त ठेवला होता.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

नऊ आरोपींचा पोलीसांकडून शोध

याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर श्रावण माने रोहित कुसमाडे,दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ  आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. सर्व आरोपींविरुद्ध  पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी एकूण 14 आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 353 332, 333 ,141, 143,147 148,149, 120 ब व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen injured deolali nashik crime marathi news