दसऱ्याचे सलग बारा तास; नदीवर दोन ज्येष्ठांची धडपड, अनोखा पवित्रा पाहून नागरिकांचा सॅल्यूट!

राजेंद्र बच्छाव
Monday, 26 October 2020

दसऱ्याच्या दिवशी सकाळी साडेआठपासून कुलकर्णी आणि पाटील दोघे ज्येष्ठ नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी घटस्थापना केली जाते. त्यामुळे हे घट आणि निर्माल्य विसर्जित करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. पण त्यावेळी दोन ज्येष्ठांच्या जीवाची घालमेल..धडपड आणि मग त्यांनीच घेतला पवित्रा..काय केले वाचा...

नाशिक / इंदिरानगर : दसऱ्याच्या दिवशी सकाळी साडेआठपासून कुलकर्णी आणि पाटील दोघे ज्येष्ठ नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी घटस्थापना केली जाते. त्यामुळे हे घट आणि निर्माल्य विसर्जित करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. पण त्यावेळी दोन ज्येष्ठांच्या जीवाची घालमेल..धडपड आणि मग त्यांनीच घेतला पवित्रा..काय केले वाचा...

दसऱ्याला दोघांनी वडापावच्या नाश्त्यावर काढला दिवस

कंपनीचे माजी कर्मचारी सतीश कुलकर्णी आणि अनंत पाटील दोघे पुलाच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी घटस्थापना केली जाते. त्यामुळे हे घट आणि निर्माल्य विसर्जित करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगत घट त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती हे दोघे करत होते. सुरवातीला काही मंडळींनी ऐकले नाही. मात्र यांनी त्यांना समजावत हे निर्माल्य नदीत टाकण्यापासून परावृत्त केले. रात्री साडेआठपर्यंत बारा तास सलग त्यांनी हे काम करत ट्रॅक्टरभर घट जमा केले. दिवसभरातून अनोळखी व्यक्तीने आणून दिलेल्या वडापावच्या नाश्त्यावर त्यांनी दिवस काढला. सायंकाळी उशिरापर्यंत एवढे मोठे निर्माल्य आणि घट जमा करून नंदिनी नदीला प्रदूषणापासून काही प्रमाणात का होईना वाचविण्यात यश आल्याचे मोठे समाधान आहे, अशा भावना या दोघांनी व्यक्त केल्या आहेत. या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या निर्माल्य आणि घट आदी साहित्यांची महापालिकेतर्फे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

सर्वांसमोर आदर्श निर्माण

धार्मिक परंपरेनुसार विजयादशमीला घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या जगदंबेच्या घटांचे आणि निर्माल्याचे विसर्जन करण्यात येते. सिटी सेंटर मॉलजवळील दोंदे पुलावरून हे निर्माल्य आणि घट नंदिनी नदीत टाकण्यासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना त्यापासून परावृत्त करत मायको कंपनीचे माजी कर्मचारी सतीश कुलकर्णी आणि अनंत पाटील यांनी नंदिनी नदीत होणाऱ्या प्रदूषणास आळा घालत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two seniors in Nashik wastage compiled marathi news