VIDEO : "देशाला कोरोना हॉटस्पॉट होण्यापासून वाचवा" युकेस्थित मराठी संशोधकाचे आवाहन

uk based mahale.jpg
uk based mahale.jpg

नाशिक : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या असतांना हजारो लोकांचे बळी घेतले आहे. आगामी काळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्यरित्या परीस्थिती हाताळली गेली नाही, तर देश कोरोना हब बनू शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यास नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद देत देशाला कोरोनाचा हॉट-स्पॉट होण्यापासून वाचविणे नागरीकांच्या हाती असल्याची भावना युनायटेड किंगडम येथील ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी येथे कार्यरत संशोधक डॉ. जगदीश महाले यांनी "सकाळ'शी संवाद साधत व्यक्‍त केली.

युकेमधून संशोधक डॉ. जगदीश महाले यांचे नागरीकांना आवाहन

महाले म्हणाले, की युनायटेड किंगडम येथे दोघांपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र फिरण्यास मनाई असून, मोठी दंडात्मक कारवाई केली जाते आहे. केवळ अत्यावश्‍यक कामासाठी नागरीक घराबाहेर पडता आहेत. एकंदरीत जगाचा विचार केल्यास कोरोना आव्हानात्मक आहे. रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटीलेटर, बेड आदी आवश्‍यक बाबींची उपलब्धता प्रगत देशांमध्येही मुबलक नाही. त्यामूळे ही समस्या व्यवस्थितरित्या हाताळली नाही, तर देश कोलमडू शकतो. भारत सध्या नाजुक परीस्थितीतून जाग असून, येथील लोकसंख्येचा विचार करता धोका गंभीर आहे. परीस्थिती हाताबाहेर गेल्यास भारत हा कोरोनाचा हॉटस्पॉट होईल, अशी भिती संशोधकांनी व्यक्‍त केली आहे. त्यामूळे नागरीकांनी शासनाच्या निदानिर्देशांचे कटेकोरपणे पालन केले पाहिजे.

कोणालाही होऊ शकतो कोरोना
आपल्याला कोरोना होणार नाही, हा भ्रम असून विशेषत: युवकांनी हा गैरसमज डोक्‍यातून काढावा. अगदी सहजरित्या या विषाणूचा फैलाव होत असून, त्यापासून दुर राहाणेच योग्य आहे. त्यामुळे नागरीकांनी आतातरी गांभीर्य ओळखावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

लस साकारण्याचे काम प्रगतीपथावर
ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधक म्हणून कार्यरत डॉ. महाले यांनी सांगितले, की येथील जेनर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांकडून लसीकरणावर संशोधन सुरू आहे. त्यास मोठ्या प्रमाणावर यश आले असून, पहिल्या टप्यात मर्यादित लोकांवर चाचणी केली जाईल. त्यांना लसीमुळे काही दुष्परीणाम जाणवले नाही, तर चाचणीसाठी रूग्णांची संख्या वाढविली जाईल. साधारणत: सहा ते आठ महिन्यांत लसीकरण उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com