रेल्वेपटरीवर आढळला कंबरेपासून दोन भाग झालेला मृतदेह; बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच

igatpuri raiway station.jpg
igatpuri raiway station.jpg

इगतपुरी (नाशिक) : रेल्वे स्टेशन मास्तरच्या अंगाचा उडाला थरकाप जेव्हा रेल्वे पटरीवर दिसला छिन्न - विछिन्न झालेला मृतदेह. कंबरेपासून दोन भाग झाल्याने अक्षरश: तो मृतदेह बघणाऱ्याला अंगावर काटा येत होता.   

अशी आहे घटना

शनिवारी (ता. २) रेल्वे स्टेशन मास्तर यांनी घटनेची खबर लोहमार्ग पोलिसांना दिली. शहरातील रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खांब क्रमांक १३५ जवळ अज्ञात व्यक्तीचा (अंदाजे वय २७) छिन्न - विछिन्न झालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस तत्काळ घटनास्थळी येऊन मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल केला. कंबरेपासून दोन भाग झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पाच फूट तीन इंच, रंग गोरा, नाक बसके, चेहरा उभट, डोळे मोठे, दाढी, मिशी काळी बारीक, शरीराचा बांधा मध्यम, उजव्या हातावर इंग्रजीमध्ये चाँदखान नाव गोंदलेले, पिवळ्या पांढऱ्या रंगाचा पट्टे असलेला फुल बाह्यांचा छातीवर रिबोक नाव छापलेला शर्ट, लाल रंगाची ट्रॅक पॅन्ट, असे वर्णन आहे. 

याबाबत तपासी ठाणे अमलदार सतीश खरडे, धनंजय सुधाकर नाईक आदी तपास करीत आहेत. कोणाला माहीत असल्यास लोहमार्ग पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com