भाजी विक्रेत्यांना हटविणाऱ्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; आकाशवाणी टॉवरजवळील घटना

atikraman.jpg
atikraman.jpg

नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर किरकोळ दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. परंतु विक्रेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्तक्षेपानंतर तूर्त कारवाई टाळली असली तरी न्यायालयाचे आदेश असल्याचे कारण देत पुन्हा कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

महापौरांच्या मध्यस्तीने कारवाई टळली 

आकाशवाणी टॉवरजवळ अनेक वर्षांपासून रस्त्यावर भाजी बाजार वसला आहे. भाजी बाजारामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नागरिकांनी भाजी बाजार बांधून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार याच भागात असलेल्या एका आरक्षित जागेवर भाजी बाजाराची उभारणी करण्यात आली. परंतु ज्या जागेवर भाजी बाजार बांधण्यात आला त्या इमारतीत तळमजल्यावर पार्किंगसाठी जागा आरक्षित असल्याने वाद निर्माण झाला. भाजी बाजारात ६५ ओटे असताना १४५ विक्रेत्यांना सामावून घेण्यावरून वाद सुरू आहे. ओट्यांचे दोनदा वाटप झाले; परंतु त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली असतानाच स्थानिक नागरिक भाविक राठोड यांनी उच्च न्यायालयात हरकत घेतली. त्यामुळे मंगळवारी होणारी ओटेवाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आली. 

अज्ञात व्यक्तींकडून अतिक्रमण पथकावर किरकोळ दगडफेक

भाजी बाजार अद्यापही रस्त्यावर बसत असल्याने अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (ता. ६) अतिक्रमण कारवाई सुरू केली. विक्रेत्यांनी कारवाईला विरोध करत अतिक्रमण पथकाभोवती मानवी कडे केले. अज्ञात व्यक्तींकडून अतिक्रमण पथकावर किरकोळ दगडफेक झाल्यानंतर वातवरण तापले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईवर प्रशासन ठाम राहिले. हा वाद महापौर सतीश कुलकर्णी यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त विजय पगार यांच्यासह अधिकाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांना रामायण बंगल्यावर बोलावून घेत चर्चा केली. तूर्तास कारवाई टाळली. 

अद्यापपर्यंत भाजी बाजारातील ओट्यांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा आदेश असल्याने कारवाई होणारच. - विजय पगार, उपायुक्त, अतिक्रमण विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com