नाशिककरांनो! आपली वाहने सांभाळा; शहरात वाहन चोरटे सुसाट 

bike thieves.jpg
bike thieves.jpg

नाशिक : दोन मोटारसायकलींसह एक अ‍ॅटोरिक्षा चोरीला गेल्याप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १६) नांदूर नाका परिसरातून उत्तम काळू कुंभारकर (वय २८, रा. मांगीरबाबा मंदिर, नांदूर नाका) यांची दोन लाख ४५ हजारांची रिक्षा (एमएच १५, एफयू ४७७१) मांगीरबाबा मंदिर परिसरात पार्क केली होती. चोरट्याने ही रिक्षा चोरून नेली. सहाय्यक उपनिरीक्षक बी. व्ही. वाघ तपास करीत आहेत.

नाशिक शहरात वाहन चोरटे सुसाट

मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल परिसरात प्रकाश सुभाष त्रिभुवन (वय ४५, रोहित हाइट्स वॉचमन रुम, जेहान सर्कल) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ ऑक्टोबरला त्रिभुवन यांची मोटारसायकल (एमएच १५, बीटी २२४७) रोहित हाइट्स येथे पार्क केली होती. चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. त्रिमूर्ती चौक परिसरातूनही चोरट्याने संदीप सुभाष कुमावत (वय ३०, रा. पंडितनगर, सिडको) यांची मोटारसायकल चोरून नेली. 

सोनसाखळी लंपास 
नाशिक : मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन ओरबाडून नेली. वृंदावननगर, म्हसरूळ परिसरात शनिवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास सुनीता भगवान तिखे (रा. वासंती सोसायटी, ओंकारनगर, म्हसरूळ) या किशोर सूर्यवंशी मार्ग येथून ओंकारनगरकडे पायी घरी चालल्या होत्या. त्या वेळी समोरून मोटारसायकलवरून आलेल्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओरबाडली. सहाय्यक निरिक्षक एस. एन. भडीकर तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com