वरती जुने टायर अन् खाली भलताच प्रकार! पदभार स्वीकारताच एपीआय पारधींची कारवाई

Vehicle transporting unlicensed animals seized
Vehicle transporting unlicensed animals seized

अंबासन (जि.नाशिक) : विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील द्वारकाधीश कारखाना फाट्यावरील दुध डेअरीनजीक संशयास्पद पिकअप असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा वर जुने टायर आणि त्याखाली वेगळाच प्रकार सुरु असल्याचे उघड झाले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (ता.४) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळनेर ताहाराबाद रस्त्यावरील द्वारकाधीश कारखाना फाट्यानजीक कसमादे अॅग्रो प्रोड्युसर लि. कंपनीचे दुध डेअरीनजीक जुने टायर भरलेला पिकअप क्र.(एमएच ४२, एयू ११४२) संशयास्पद हलताना दुध डेअरीवर काम करणारा आकाश चव्हाण यांना दिसला त्यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे यांना भ्रमणध्वनीवर माहीती दिली असता अन्य मित्र गणेश पवार, अमोल देवरे, भुषण देवरे, बंडू देवरे, हर्षल आहिरे, आकाश चव्हाण, पोपट सोनवणे, डाॅ. नितीन पवार यांना घेऊन पोहचले दरम्यान जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी काही वेळातच दाखल झाले.

पदभार स्वीकारताच धडाकेबाज कार्यवाही! 

पिकअप बेकायदेशीर जनावरे निर्दयपणे कोंबून कत्तलीच्या इराद्याने वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.नुकताच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण बी. पारधी यांनी धडाकेबाज कारवाई करत गायींची सुटका केली. सदर वाहन ताब्यात घेतले, मात्र अंधाराचा अंदाज घेऊन चालक फरार झाला. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक पारधी यांचे कौतुक

तरूणांच्या मदतीने टायरखाली निर्दयपणे बांधलेले तीन गायी व एक वासरू यांची सुटका केली. यात दोन गायी किरकोळ जखमी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनासह चार लाख ७५००० /- हजार किमंतीचा माल हस्तगत करून जायखेडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पारधी यांनी पदभार स्वीकारताच धडाकेबाज कार्यवाही केल्याने परिसरात कौतुक केले जात आहे.  

यापुढे जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास कठोरपणे कार्यवाही केली जाईल जनतेने पुढे यावे. परिसरात काही शेतक-यांच्या फसवणूकीचा प्रकार निदर्शनास आले आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा आम्ही पुरेपूर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. - श्रीकृष्ण बी. पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com