...तर आम्हीसुद्धा राजीनामे देणार! सटाण्यात नगरसेवकांचा इशारा; नाट्यमय घडामोडी  

अंबादास देवरे
Saturday, 20 February 2021

पालिका सभागृहात नाट्यमय घडामोडींना वेग आला होता. मोरे यांच्या शहर विकास आघाडीच्या दहा नगरसेवकांनी नगराध्यक्ष  राजीनामा देणार असतील, तर आम्हीही सांघिक राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली.

सटाणा (जि.नाशिक) : येथील पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गुरुवारी (ता. १८) नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे पडसाद शुक्रवारी (ता. १९) दिवसभर पालिका वर्तुळात उमटले. पालिका सभागृहात नाट्यमय घडामोडींना वेग आला होता. मोरे यांच्या शहर विकास आघाडीच्या दहा नगरसेवकांनी नगराध्यक्ष मोरे राजीनामा देणार असतील, तर आम्हीही सांघिक राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी (ता. २२) नगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आघाडीच्या नगरसेवकांनी सांगितले. 

सटाण्यात नगरसेवकांचा इशारा; नाट्यमय घडामोडी 
सटाणा पालिकेत सुनील मोरे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आले आहेत. शहर विकास आघाडी स्थापन करून सोबत नऊ नगरसेवक निवडून आलेले आहेत. शहरात पुनंद पाणीपुरवठा योजना, रिंग रोड, नाना-नानी पार्क, स्कायवॉक, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, अंतर्गत जलवाहिन्या, उद्यान आदी कामे पूर्ण झाली. तसेच भुयारी गटार योजना प्रस्तावित आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नुकतेच देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाने तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. उर्वरित विकासकामे लवकर मार्गी लागतील अशी आशा शहरवासीय करत असतानामोरे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त व्हायरल झाले. या राजीनामानाट्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही नगराध्यक्ष मोरे नॉट रिचेबल होते.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of corporators in Satana nashik marathi news