...तर नव्या वर्षात शाळाबंद आंदोलन करू; शिक्षणसंस्था महामंडळाकडून सरकारला इशारा 

teachers 123.jpg
teachers 123.jpg
Updated on

नाशिक रोड : शिक्षकभरती, शाळांचे अनुदान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न, शिपाईभरती खासगी पद्धतीने करणे, वेतनेतर अनुदान व अन्य शैक्षणिक मागण्या सरकारदरबारी मांडल्या असून, त्या मान्य न झाल्यास १५ जानेवारीपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी सरकारला दिला. 


शाळांचे प्रश्न सध्या खूपच जटिल होत चालले आहेत.

शिक्षणसंस्था चालवायच्या कशा, असा प्रश्न संस्थाचालकांपुढे निर्माण झाला आहे. विनाअनुदानित शाळांना मान्यता देणे, राइट टू एज्युकेशन सिस्टिमच्या अडचणी, शिष्यवृत्ती अडवून ठेवणे, शिक्षणसंस्थांची वीजबिलांसाठी शासनाचे अनुदान हवे आहे. त्याचबरोबर शिपाई भरती आउटसोर्सिंग पद्धतीने करणे, शिक्षकभरतीचा गंभीर होत चाललेला जटिल प्रश्न सुटला नाही, तर महाराष्ट्रातील खासगी शिक्षणसंस्था १५ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत, असा निर्णय शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. सरकार बदलले पण धोरणात अजूनही काहीच बदल झाला नाही. दिल्लीमध्ये ९ टक्के शिक्षणावर खर्च केला जातो. म्हणून तेथील शाळा गुणवान आहेत. महाराष्ट्रावर करायला काय अडचण आहे? शिक्षणात गुणवत्ता आणायचे असेल तर शिक्षणसंस्थांना ऊर्जितावस्था देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तरच कल्याणकारी राज्याची संकल्पना अमलात आणली जाईल, असे विजय नवल पाटील यांनी सांगितले. 

शिक्षणसंस्था वाचाव्यात व शिक्षणामध्ये पारदर्शकता व गुणवत्ता आणावी
सरकारला एक सूचनावजा इशारा असल्याचेही त्यांनी सांगितले असून, लोकप्रतिनिधी व संस्था पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचे ठरविले आहे. शिक्षणसंस्था वाचाव्यात व शिक्षणामध्ये पारदर्शकता व गुणवत्ता आणावी हाच यामागचा हेतू असून, सरकारने कोरोनासारखीच शिक्षणाची बाब गंभीरपणे घेऊन शिक्षणसंस्थांच्या अडचणी सोडवाव्यात, अशा आशयाचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना शिक्षणसंस्था महामंडळाने दिले. 

नव्या सरकारने जसे आमचे कुटुंब आमची जबाबदारी ही संकल्पना राबविली आहे, तसेच आमची शाळा आमची जबाबदारी ही संकल्पना आम्ही राबवायला तयार आहोत. सरकारने केजी टू पीजी शिक्षणसंस्था सुरू करण्यासंबंधी अध्यादेश काढावा. त्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. सरकारच्या आडमुठेपणामुळे शिक्षणसंस्थाचालकांना संस्था बंद कराव्या लागू नयेत. -विजय नवल पाटील, अध्यक्ष, शिक्षणसंस्था महामंडळ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com