लग्नाआधीच सासरच्यांच्या विरोधात महिलेची तक्रार; आई-वडिलही आश्चर्यचकित

सतीश निकुंभ 
Tuesday, 27 October 2020

टीव्ही, सिरियल, फिल्मी दुनिया तसेच शहरातील फोरवर्डेड जगण्याच्या नादात अनेक सामान्य कुटूंबातील भावी पिढीवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार सातपूरमध्ये समोर आला आहे.  

नाशिक / सातपूर : टीव्ही, सिरियल, फिल्मी दुनिया तसेच शहरातील फोरवर्डेड जगण्याच्या नादात अनेक सामान्य कुटूंबातील भावी पिढीवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार सातपूरमध्ये समोर आला आहे.  

लग्नाआधीच सासरच्यांच्या विरोधात महिलेची तक्रार

सातपूर मधील एका कंपनीत एचआर व्यवस्थापनात काम करत असलेल्या मुलाची त्याच्याच एका मित्राच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या मुलीशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतरण मैत्रीत व नंतर प्रेम संबधात झाले. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यात ही मुलगी जिवनात आली आणि त्याच काळात पगारवाढची भर पडली. त्यामुळे मुलीचा पाय गुण चांगला आहे असा मनाची समज करत त्याने क्षणाचा विचार न करता तिला लग्न करण्याबाबत विचारले पण प्रेमीका हुशार होती. तिने काही दिवस "लिव्ह इन रिलेशन" मध्येच राहण्याचा आग्रह धरल्यावर मुलानेही नाइलाजाने त्वरित होकार देत लग्न न करताच घर सोडून कामगार नगर परिसरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनमध्ये चित्रच पालटले!

काही महिने गुण्यागोविदांने गेले. पण अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यात कंपनीने काही कामगार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यात नेमक मुलाचा नंबर लागला. नोकरी गेल्यामुळे घरात आर्थिक चणचण वाढली. त्यात दोघांचाही स्वभाव तापट आसल्याने भांडणाला सुरवात झाली. पुढे सततच्या या भांडणाला कंटाळून प्रेमिकेने मुलाला धडा शिकवण्यासाठी थेट पोलिसात गेली. आणि मुलासह सासरच्या संपुर्ण कुटूंबावरच आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याची तकार केली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

आई-वडीलांचा संबध नसतांनाही मानसिक त्रास

या तक्रारींची दखल घेत सातपूर पोलिसांनी संबंधित मुलांची चौकशी सुरू केली असता मी लग्नच केले नाही तरी सासरच्या मंडळी विरोधातक्रार केल्याचे सांगितले. यानंतर मुलाने तिची विनवणी करत "मला काय शिक्षा द्यायची ती दे पण माझ्या कुटूंबीयाना यात अटकवू नको" असे सांगितले. या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे मात्र आई-वडीलांचा संबध नसतांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman complaint against in laws before marriage satpur nashik marathi news