पेपर मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू; दिंडोरी तालुक्यातील घटना

दिगंबर पाटोळे
Monday, 25 January 2021

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारातील गोदावरी पेपर मिल कंपनीतील कामगाराचा पेपर रोल व फोरक्लिप मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी निष्काळजीपणे फोरक्लिप मशिन चालविणाऱ्या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारातील गोदावरी पेपर मिल कंपनीतील कामगाराचा पेपर रोल व फोरक्लिप मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी निष्काळजीपणे फोरक्लिप मशिन चालविणाऱ्या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

लखमापूर येथील गोदावरी पेपर मिलमध्ये मजुरीचे काम करणारा राजकुमार छोटाई सहाणी (वय २२, रा. सेमिया, पो. नेवारी, ता. घोरावल, जि. सोनभद्रक, उत्तर प्रदेश) हा रविवारी (ता. १७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोदावरी कंपनीतील पेपर रोलकडे तोंड करून उभा असताना रमजान शेख (रा. लखमापूर, ता. दिंडोरी) फोरक्लिप मशिनवर बसून मशिन सुरू केले. त्यामुळे राजकुमार छोटाई सहाणी याला पाठीमागून जोराची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रमजान शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker dies after getting stuck in paper mill machine nashik marathi news