नियतीची खेळी! रोजीरोटीसाठी घरदार सोडलेल्या गौतमचा दुर्देवी अंत; तब्बल 23 तासांनी सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

पाण्यामध्ये त्याचा स्वत:ला वाचविण्यासाठी संघर्ष सुरु होता. मित्रांनीदेखील त्याला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. मात्र सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.

नाशिक : (निफाड) गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील...रोजी रोटीसाठी निफाडला आला. घरापासून दूर, घरातल्यांना सोडून. वय अवघे एकवीस. कामाला जायची घाई. नदीवरच आंघोळ करुन कपडे धुतले. तेवढ्यात काळाने मात्र झडप घातली अन् काही मिनीटांतच...वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

शुक्रवार (ता. २३) सकाळची वेळ...निफाड येथील निवृत्तीनगर परिसरात राहणारा रामजनम रामकरण गौतम (२१) हा मजूर कादवा नदीवर गेला होता. नदीपात्रात आंघोळ केली, कपडे धुतले. सोबत त्याचे मित्रदेखील होते. अचानक कपडे धुवत असतांना त्याचा पाय घसरला अन् तो थेट नदीपात्रात पडला. पाण्यामध्ये त्याचा स्वत:ला वाचविण्यासाठी संघर्ष सुरु होता. मित्रांनीदेखील त्याला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. मात्र सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. मित्रांनी घडलेला प्रकाराबाबत पोलिसांना कळविले. गौतम याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. या पथकाने गौतम याचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्र झाल्याने सदर शोधकार्य थांबविण्यात आले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

तब्बल तेवीस तासांनी गौतम सापडला...

अखेर शनिवारी (ता. २४) सकाळी ९ च्या सुमारास पथकाने पुन्हा शोधमोहीम हाती घेतल्यानंतर गौतम याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. गौतम याच्या मृतदेहाची निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी माळी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार सोनवणे, पोलीस नाईक त्र्यंबक पारधी हे करीत आहेत.

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers death drowns in kadwa river nashik marathi news