लाॅकडाऊन काळात लासलगावच्या यशची नासाला गवसणी...वाचा यशाची कहाणी

yash nasa.jpg
yash nasa.jpg

नाशिक / लासलगाव : लॉकडाउनच्या काळात लासलगावच्या यश पाटीलने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ढगांचे निरीक्षण (क्लाउड ऑब्झरवेशन) नोंदवून पाऊस, वादळ, वारे कधी आणि किती प्रमाणात येतील, याबद्दल केलेल्या अभ्यासाची अमेरिकेच्या नासाने दखल घेतली. यामुळे त्याला मेंबर ऑफ नासा सिटीझन सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

यश पाटील नासाचा सिटीझन सायंटिस्ट

चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात त्याने हे यश मिळवले आहे. यशने नासाच्या सॅटॅलाइट मॅच, तसेच नासा ग्लोब मिट मध्येही क्लाउड ऑफ ऑब्झरव्हर म्हणून काम केले आहे. ढगांबद्दल नोंदवलेल्या आणि शिक्षणाची यशस्वी जुळणी नासाच्या जिओ, ॲक्वा आणि टेरा या आधुनिक उपग्रहासोबत झाली. यामुळे यशला मेंबर ऑफ नासा सिटीजन सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याला नासा ग्लोब कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रशिक्षणामध्ये नासा ग्लोबल निरीक्षक म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांच्यासह संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.  

रिपोर्ट - अरुण खंगाळ

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com