भांडणाने आईवडिलांपासून दूरावला..कोरोना संकटात भेटला तेव्हा गळ्यात पडून रडला!

maaylek nashikroad.jpg
maaylek nashikroad.jpg
Updated on

नाशिक रोड : भारतभर कोरोना आजाराचे संकट ओढवलेले असतानाच या संकटातून निराधार व बेघरांना सहारा देताना नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यांच्या सौजन्याने आई-वडिलांपासून दुरावलेल्या एका शिक्षित तरुणाची भेट घडून आली आहे. वाईटातून चांगलं घडले आहे.

वाईटातून घडले चांगले...

आई वडिलांशी मतभेद झाल्यामुळे रागारागाने लॉकडाऊनच्या परिस्थितीत धुळ्यातील सुशिक्षित तरुण गिरीश कुंवर हा घरात भांडण झाल्याने नाशिक मध्ये आला आणि तो येताच संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे आहे तिथंच थांबला. नाशिक रोड पोलिस स्टेशन व काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या निराश्रित लोकांना छप्पर व अन्नछत्र द्यायचे असा निर्णय घेतला व या सर्वांना उचलून नाशिक रोड येथील जैन भवन धर्मदाय संस्थेत आणण्यात आले. गिरीशने सुरुवातीला दोन दिवस बिटकों पॉइंट इथं आश्रय घेतल्यानंतर त्याला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी जैन भवन येथील निराश्रित गृहामध्ये केली.

आई-वडिलांपासून दुरावलेल्या तरुणाची भेट घडली

नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम गोहाड अमर सरवैया ,सुभाष घीया, तेहसीन खान, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले यांनी गिरीश कुंवरची चौकशी केल्यानंतर तो घरात भांडण करून धुळ्याहून नाशिकला रागाने निघून आल्याचं निष्पन्न झालं. सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न व अखेर खाकीतली माणुसकी जागी झाली अन् पोलिस व कार्यकर्त्यांनी गिरीशच्या आई वडिलांना फोन करून मुलगा सुखरूप असल्याचे आनंदाची बातमी दिली.

आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागले
गिरीश कुंवर यांची आई छाया कुवर यांची भेट होताच दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागले. गिरीश च्या आईवडिलांनी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. वाईटातून चांगलं घडतं यालाच इष्टापत्ती म्हणतात असंच लोक सध्या म्हणत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com