
नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यात आले आहेत. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाउस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या बंगल्यांमध्ये बेत आखण्यास सुरवात केली आहे.
इगतपुरी (जि.नाशिक) : नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यात आले आहेत. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाउस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या बंगल्यांमध्ये बेत आखण्यास सुरवात केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी इगतपुरीत मुंबई, नाशिककडून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
२०२० वर्षाला अलविदा म्हणत २०२१ या वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी मित्रमंडळींचे व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय झाले आहेत. डिसेंबरच्या काहीशा कडाक्याच्या थंडीत एकत्रित जमण्याच्या दृष्टीने जागा आणि व्यवस्थेचे नियोजन सुरू आहे. कॉलेजच्या ग्रुपवर, कार्यालयातील सहकाऱ्यांचा ग्रुप, शालेय मित्रमंडळी, कॉलनीतील मित्रांच्या ग्रुपवर सेलेब्रेशनची स्थळे निश्चित होऊन बेत आखले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजबजणारी हॉटेल नकोच, अशा मानसिकतेतही तरुणाई दिसून येत आहे. त्यामुळे एकतर फार्म हाउस किंवा गावाबाहेर घर, बंगला असणाऱ्यांच्या गच्चीत पार्टीचे बेत आखले जात आहेत.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
पर्यटकांना इगतपुरीच्या सौंदर्याचा मोह
नयनरम्य निसर्ग, आल्हाददायक वातावरणाचा हौशी पर्यटक व भाविकांना मोह निर्माण झाला आहे. तीन-चार दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्गावर, घोटी-सिन्नर महामार्ग तसेच घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहनांची गर्दी दिसत आहे. आठवडाभर ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे सात-आठ महिने भाविक, पर्यटकांना बाहेर पडता न आल्याने मुंबई, नाशिककडील पर्यटकांना इगतपुरी तालुक्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. वाहतूक कोंडीचा फटका दस्तुरखुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसला होता.
असे आहेत पिकनिक पॉईंट
भावली मार्ग, वैतरणा मार्ग, सिन्नर मार्ग, ठिकठिकाणी पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाचा आनंद घेत आहेत. वनभोजन तसेच फोटोश्यूट करताना दिसतात. इगतपुरी तालुक्यातील सर्वच मार्गावरील हॉटेलवर गर्दी दिसत आहे. इगतपुरी तालुक्यात गडकिल्ले आहेत, मनमोहित भावली परिसर, धरणांचा निसर्ग, भूतलावरील स्वर्ग म्हणजे घोटी वैतरणा मार्ग त्र्यंबकेश्वर, शिर्डीकडे जाणारे भाविक, कावनईचे पंपासरोवर, टाकेदचे तीर्थक्षेत्र पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप