भोंदूबाबाच्या फेसबुकवरील जाहिरातीवर ठेवला विश्वास; युवकाला ५० हजारांचा फटका

crime fraud
crime fraud

जुने नाशिक : भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडत अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या युवकाला ५० हजारांचा फटका बसल्याचा प्रकास उघड झाला. युवकाने भोंदूबाबाविरुद्ध भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल केली. 

पूजा विधींच्या नावे फसवणूक

पीडित युवक सचिन परमार याने संशयित भोंदूबाबाची फेसबुकवर जाहिरात पाहिली. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी पूजा विधी केली जात असल्याची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली होती. संपर्कासाठी कानपूर, आर्यनगर येथील आचार्य सतीश अवस्थी असे नाव व त्यापुढे मोबाईल क्रमांक दिला होता.  युवकाने त्यांच्याशी संपर्क साधला. सर्व अडचण दूर करण्यासाठी विशेष पूजाविधी करावी लागले, असे सांगत त्याने खात्यामध्ये काही रक्कम टाकण्यास सांगितली.

९ नोव्हेंबर २०१९ ते १० मार्च २०२० पर्यंत वेळोवेळी कधी एक हजार पाचशे, कधी तीन हजार, १० हजार अशी एकूण ५० हजारांची रक्कम ऑनलाइन खात्यावर टाकली. इतके करूनही काही एक फरक पडला नाही. युवकाने पूजाविधी केल्याचा व्हिडिओ किंवा ध्वनिफीत व्हॉट्सॲपवर टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्याने युवकाचा मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांक दोन्ही ब्लॉक करून टाकले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com