तळोद्यात धनादेश अनादर प्रकरणी 2 लाखाचा दंड

2 lakh fine for check bounce
2 lakh fine for check bounceesakal

आमलाड : तळोदा येथील फौजदारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड व १ महिन्याची साध्या कैदेची शिक्षा नुकतीच ठोठावली.

रामचंद्र शंभू चौधरी (रा.तळोदा ) यांना वाहिद उर्फ वायद दादामिया पठाण (रा.तळोदा ) याने आपसातील हातउसनवारीतील व्यवहारापोटी एक लाख पन्नास हजार रुपयेचा मोती अर्बन बँक शाखा तळोदाचा धनादेश तारखेस खात्यात रक्कम शिल्लक न ठेवल्याने धनादेश अनादर प्रकरणी फौजदारी दावा रामचंद्र शंभू चौधरी यांनी दाखल केला होता. धनादेश अनादर नंतर ही धनादेश रक्कम न आणून दिल्याने व ही बाब पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध झाल्याने वाहिद उर्फ वायद दादामिया पठाण याला २ लाख रुपये दंड व १ महिन्याची साधी कैद व रक्कम न दिल्यास १ वर्षाची कैद अशी शिक्षा न्यायमूर्ती एस. डी. हरगुडे यांनी ठोठावली. फिर्यादी रामचंद्र शंभू चौधरी यांचे तर्फे ॲड. संजय पुराणिक, व ॲड. संदीप पवार यांनी बाजू मांडली.

2 lakh fine for check bounce
Nandurbar : शेतजमीन, दागिन्यांसाठी बहिणीचा खून; निर्दयी भावाला अटक
2 lakh fine for check bounce
चक्क डुप्लिकेट चावी लावून चोरट्यांनी पळविली चारचाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com