
Nandurbar Crime News : शिक्षकाच्या घरी भरदिवसा घरफोडी झाल्यानंतर पोलिसांच्या श्वानपथकाने गुरुवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. या वेळी पथकातील श्वान गोपाळनगरमधील रस्त्याने मीरा कॉलनीतील रस्त्यापर्यंत येऊन शहादा रस्त्यावरील टाइल्सचा दुकानाजवळ येऊन थांबला. (3 teams to investigate house burglary in Taloda nandurbar crime news)
त्यामुळे चोरटे शहादा रस्त्याने वाहनातून प्रसार झाल्याचा अंदाज लावला जात आहे. दुसरीकडे घटनेचा तपास करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे स्वतंत्र पथक तपास करीत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासणीसाठी पोलिसांना सूचना केल्या.
भरदिवसा घरफोडीच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या पथकाने पाहणी करून माहिती घेतली. त्यात श्वानाने मीरा कॉलनीकडून शहादा रस्त्यापर्यंतचा माग दाखविला. त्यामुळे तपासात मदत मिळणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहर कळण्याआधीच अधिकाऱ्याची होते बदली
तळोदा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या रूपाने अनेक महिन्यांनी कायमस्वरूपी पोलिस निरीक्षक तालुक्याला मिळाले आहेत. तळोदा पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षांत मे २०२० ते जुलै २०२२ या कालावधीत सहा पोलिस निरीक्षक बदलून गेले आहेत.
त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच तालुक्याची इत्थंभूत माहिती अधिकाऱ्याला अंगवळणी होण्याचा आतच अधिकाऱ्याची बदली होण्याचे सत्र मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नव्याने आलेले पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार किमान कार्यकाळ पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात दिवसा घरफोडीच्या घटनेमुळे शहरातील वातावरण भीतीमुक्त करण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.