Nandurbar Crime News : तळोद्यात शिक्षकाच्या घरी दिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

Cupboards broken by burglars and furniture left in disarray and broken window in kitchen
Cupboards broken by burglars and furniture left in disarray and broken window in kitchenesakal

Nandurbar Crime News : शहरातील शहादा रस्त्यावरील गोपाळनगरमध्ये सोमावल येथे शिक्षक असलेले सुनील मगरे यांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

दरम्यान, या चोरीत मुलीच्या लग्नासाठी घेतलेले व कौटुंबिक हिस्से वाटणीत मिळालेले सोन्याचा समावेश असल्याने चोरीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान मिळाले आहे. (burglary at teacher house in morning nandurbar crime news)

सोमावल येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले सुनील मगरे शाळेत असताना त्यांचा गोपाळनगर येथील घरात घुसून दिवसाढवळ्या हात साफ केल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. २२) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घराच्या मागील बाजूची किचनची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात दिवसाढवळ्या प्रवेश केला.

त्यात बेडरूममध्ये असलेली दोन कपाटे फोडून चोरट्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त केले. त्या वेळी कपाटातील सहा तोळे गळ्यातील पोत, चार तोळ्यांच्या छडा, मुलीच्या लग्नासाठी केलेली तजवीज म्हणून घेतलेले सहा तोळे सोने, चार ग्रॅमचे मणी तसेच चांदीचे १५ तोळ्यांचे दागिने असा सुमारे नऊ लाखांचा ऐवज नेला आहे. त्यामुळे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले.

मुलीच्या लग्नासाठी केलेली तजवीजदेखील गेल्याने कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. यात मगरे कुटुंबातील सदस्य मोठा माळी वाड्यातील त्यांच्या मोठ्या बंधूंकडे गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cupboards broken by burglars and furniture left in disarray and broken window in kitchen
Nashik Crime News : नाशिक हादरले! नाशिकरोड रेल्वेस्थानकावर विवाहित तरुणीवर अत्याचार

मात्र काही कामानिमित्त घरी आल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.

त्यामुळे मगरे कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. तातडीने पोलिसांना कळविल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल, पोलिस नाईक अजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. नंदुरबार येथून श्वानपथक मागवून मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तळोद्यात यापूर्वी नागरिकांना रात्रीच्या घरफोड्या होण्याचा अनुभव होता. मात्र दिवसादेखील तळोद्यात घरफोडी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात शहादा रोडवरील नवीन वसाहती व गोपाळनगरमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण व भीती दूर करण्यासाठी चोरट्यांना पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसांना मिळाले आहे.

Cupboards broken by burglars and furniture left in disarray and broken window in kitchen
Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com