Dhule News : कापडणे केंद्रशाळेत सेमी इंग्लिशसह पाचवीचाही वर्ग

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविधांगी उपक्रम राबविण्याचा निर्धार शैक्षणिक ग्रामसभेत झाला.
Center Principal Ramrao Patil while guiding the parents of the villagers in the educational village meeting.
Center Principal Ramrao Patil while guiding the parents of the villagers in the educational village meeting.esakal

Dhule News : एकशे साठ वय वर्षे असलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत येत्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू करणे, पाचवीचा वर्गही सुरू करणे. ग्रामपंचायत व लोकसहभागातून प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही बसविणे, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा तयार करण्यासाठी अविरत प्रयत्न करणे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविधांगी उपक्रम राबविण्याचा निर्धार शैक्षणिक ग्रामसभेत झाला. (5th class with Semi English in Kapadne Kendra school dhule news)

येथील ऐतिहासिक गढीवर जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोनची शैक्षणिक ग्रामसभा झाली. त्या वेळी विविध ठराव झाले. केंद्रप्रमुख हेमलता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा आशा माळी, समिती सदस्य जगन्नाथ पाटील, सिद्धार्थ बागूल, माया बागूल, तुकाराम माळी, अशोक माळी, जितेंद्र माळी, योगेश माळी, प्रमोद सैंदाणे, उमेश माळी, पूनम माळी आदी उपस्थित होते.

शैक्षणिक ग्रामसभेत गावातील प्रत्येक बालकाला शाळेत दाखल करणे, शाळेव्यतिरिक्त मुलांचे गल्लीनिहाय अभ्यासगट तयार करणे, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी असणे, शाळांमध्ये स्वच्छ आणि वापरण्याजोगी शौचालये असणे.

Center Principal Ramrao Patil while guiding the parents of the villagers in the educational village meeting.
Dhule News : धुळे बाजार समितीत कामांचे लोकार्पण

ग्रामपंचायतीने शैक्षणिक योजना तयार करणे, ग्रामविकास आराखड्यात शाळा विकास आराखडा समाविष्ट करणे, शाळेत पुरेशी शिक्षकसंख्या असणे, मुलांच्या शिक्षणासाठीचे शैक्षणिक वातावरण तयार करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान, केंद्रमुख्याध्यापक रामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक शरद चौधरी यांनी अहवालवाचन केले.

ज्योत्स्ना पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. छाया सूर्यवंशी, रतनप्रभा पाटील, अर्चना वाणी, ज्योत्स्ना पाटील, जागृती खैरनार, भाग्यश्री भामरे, रूपाली पाटील, वैशाली पाटील, विजय पाटील व ज्योती सोनार यांनी संयोजन केले.

Center Principal Ramrao Patil while guiding the parents of the villagers in the educational village meeting.
Dhule News : जिल्ह्यात बाउन्सर, पहिलवान, मल्लांना नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com