Dhule News : हिरे वैदकीय महाविद्यालयास 61 कोटींचा निधी

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत शहरातील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात लेक्चर हॉल, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधकामासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Farooq Shah and officials attending the meeting with Minister Hasan Mushrif.
Farooq Shah and officials attending the meeting with Minister Hasan Mushrif.esakal

Dhule News : केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत शहरातील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात लेक्चर हॉल, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधकामासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

याकामी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार फारुक शाह यांनी दिली.(61 crore fund for Here Vedic College dhule news)

राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त निधीतून हे काम प्रस्तावित आहे. त्याबाबतचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. शासनाच्या धोरणानुसार शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ईडब्लूएस कोट्यातून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित आहे.

वाढीव विद्यार्थी संख्येसाठी लेक्चर हॉल, तसेच १५० विद्यार्थी व १५० विद्यार्थिनींसाठी वसतीगृह आवश्यक होते. त्यादृष्टीने आमदार शाह यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने लेक्चर हॉल, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहासाठी ६१ कोटी रुपये मंजूर केले.

Farooq Shah and officials attending the meeting with Minister Hasan Mushrif.
Dhule News : ‘मालनगाव’ की ‘अक्कलपाडा’ कोणती योजना फायदेशीर? शहराला मुबलक पाण्याची गरज

हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात ही सुविधा प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. याबद्दल आमदार शाह यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.

Farooq Shah and officials attending the meeting with Minister Hasan Mushrif.
Dhule News : कापडणे केंद्रातून सर्वाधिक विद्यार्थी स्थलांतरित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com