Navratri 2023 : लायन्स क्लबच्या दांडिया उत्सवात ‘तारक मेहता’ फेम कलाकारांची हजेरी

फोटो- NSK23G58612
Actors of Taarak Mehta will attend Lions Club Dandiya Utsav dhule navratri news
Actors of Taarak Mehta will attend Lions Club Dandiya Utsav dhule navratri news

Navratri 2023 : नवरात्रोत्सवात लायन्स क्लब धुळेतर्फे दर वर्षी गरबा दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या ३४ वर्षांपासून असे उपक्रम सुरू आहेत. या वर्षी सोमवारी (ता. २३) टीव्हीवरील प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील कलाकार सोनू ऊर्फ निधी भानुशाली, तर मंगळवारी (ता. २४) याच मालिकेतील डॉ. हाथी अर्थात निर्मल सोनी व ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील भक्ती गणात्रा यांची उपस्थिती लाभणार आहे. (Actors of Taarak Mehta will attend Lions Club Dandiya Utsav dhule navratri news)

लायन्स क्लब धुळेतर्फे नवरात्रोत्सवात शहरातील कलाप्रेमींना गरबा दांडिया खेळण्यासाठी दर्जेदार व उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते.

शहरातील कलाप्रेमींना उत्साहित व आकर्षित करण्यासाठी क्लबतर्फे दर वर्षी प्रसिद्ध कलाकारांना बोलविण्यात येते. या वर्षी निधी भानुशाली, निर्मल सोनी व भक्ती गणात्रा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Actors of Taarak Mehta will attend Lions Club Dandiya Utsav dhule navratri news
Navratri 2023 : आई अंबाबाई मंदिराचे हे जूने फोटो तुम्ही पाहिलेत का?

लायन्स क्लब आयोजित खानदेश बाजार प्रायोजित गरबा दांडिया उत्सव-२०२३ ला हे कलाकार भेट देतील. गिंदोडिया कंपाउंड (मालेगाव रोड धुळे) येथे हा कार्यक्रम होत आहे. धुळेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब धुळेतर्फे संयोजकांनी केले आहे.

Actors of Taarak Mehta will attend Lions Club Dandiya Utsav dhule navratri news
Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com