Rawalapani: Pava family harvesting mangoes in the field. Ratilal and his family while selling mangoes from the farm at dawn.
Rawalapani: Pava family harvesting mangoes in the field. Ratilal and his family while selling mangoes from the farm at dawn.esakal

Success Story : रावलापाणीत बहरली आमराई; रतिलाल पावराने घेतले दीड लाखांचे उत्पन्न

Nandurbar News : सातपुड्याच्या डोंगर कपारीतील रावलापाणी या छोट्याशा पाड्यातील रतिलाल पावरा या तरुण शेतकऱ्याने वेगळी वाट निवडत आपल्या शेतात चक्क ५०० आंब्याची फळबाग फुलवली आहे.

प्राथमिक सुविधांचा अभाव असताना केवळ जिद्द व अथक परिश्रमांचा जोरावर रतिलालने डोंगरावर असलेल्या व खडकाळ जमिनीवरील आपल्या शेतातील आमराई मधून यंदा सुमारे दीड लाख उत्पन्न मिळवीत अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. (Amrai bloomed in Ravlapani Ratilal Pawar received an income of one and a half lakhs Nandurbar News)

रावलापाणी हे तळोदा तालुक्याचा अगदी शेवटच्या टोकावर, डोंगर-दऱ्यांवर वसलेले अगदी लहान पाडे असून याठिकाणी रतिलालच्या कुटुंबाला वनपट्ट्याची जमीन मिळाली. त्या जमिनीतून पावरा कुटुंबीय आपला जीवन चरितार्थ चालवीत होते. दरम्यान रतिलालच्या वडीलांचे २०१३ मध्ये निधन झाले, कुटुंबाची सर्व जबाबदारी आपसूकच त्याच्यावर आली.

त्याने शेतात पारंपरिक पीक घेत संसाराचा गाडा हाकण्यास सुरवात केली, परंतु त्यात जास्त उत्पन्न मिळत नव्हते व कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्याने कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करीत शेतात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व २०१६ मध्ये आंब्याची फळबाग लावण्याचे ठरविले.

यासाठी त्याने तळोदा कृषी विभागाशी संपर्क साधला. कृषी विभागाने त्याच्यामधील धडपड बघून शासनाच्या योजनेतून फळबागसाठी अनुदान मंजूर करीत एकूण २५० आंब्याची रोप दिली. रतिलाल व कुटुंबातील सर्व सदस्यांनी डोंगराळ, खाचखळगे असलेल्या शेतात स्वतः खड्डे खणत आंब्यांची रोप लावली. त्यानंतर नाबार्डच्या माध्यमातून लुपिन ह्यूमन फाउंडेशनने त्याला १५० रोप दिली, आणि त्याने स्वखर्चाने १०० रोप घेत, शेतात एकूण ५०० आंब्याची रोपे लावली.

Rawalapani: Pava family harvesting mangoes in the field. Ratilal and his family while selling mangoes from the farm at dawn.
Nandurbar News : आषाढी एकादशी - बकरी ईद एकाच दिवशी; ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय

रतिलालच्या कुटुंबातील आई लावीबाई पावरा, पत्नी आशा पावरा तसेच, लहान भाऊ रवींद्र पावरा, भीष्मा पावरा आणि बहीण काजोल पावरा, अरुणा पावरा यांनी मेहनत घेऊन आंब्याची फळबाग फुलवली.

मागच्या वर्षी आंबे विक्रीतून त्यांनी सुमारे पन्नास हजार रुपये कमविले होते. यंदा त्याने आमराई मधून सुमारे दीड लाख उत्पन्न मिळवीत अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळात त्याचे मोठे नुकसान झाले होते नाही तर त्याने आणखी जास्त उत्पन्न घेतले असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rawalapani: Pava family harvesting mangoes in the field. Ratilal and his family while selling mangoes from the farm at dawn.
Nandurbar News : नंदुरबार पालिकेच्या 5 शाळा Digital; HDFC Bank कडून सीएसआर फंडातून 40 लाखांची मदत

"धाडस करून शेतात आंब्याची रोप लावली, त्या वेळी जवळचे लोकच हेटाळणी करायचे आणि पाणी, इतर संसाधन अभावी प्रयोग यशस्वी होणार नाही असे सांगायचे. परंतु कुटुंबातील सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेत प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. आंब्याच्या फळबागेतून यंदा सुमारे दीड लाख उत्पन्न मिळाले असून तळोदा कृषी विभाग, नाबार्ड, लुपिन यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे."

- रतिलाल पावरा, प्रयोगशील शेतकरी, रावलापाणी.

Rawalapani: Pava family harvesting mangoes in the field. Ratilal and his family while selling mangoes from the farm at dawn.
Succes Story : कष्टकरी गिरणी व्‍यावसायिकाची मुलगी झाली 'सीए'; खडतर प्रवासातून गाठले यशाचे शिखर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com