Animal Bird Survey : सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात सर्वाधिक मोरांचा अधिवास; बुद्ध पौर्णिमेला गणना

peacock
peacockesakal

Nandurbar News : तळोदा तालुक्यासह सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात बिबट्या, अस्वल, तरस ,कोल्हा, लांडगा या हिंस्र प्राण्यांसह शेकडोंच्या संख्येने मोरांचा अधिवास असल्याचे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या प्राणी गणनेवरून स्पष्ट झाले. (animal bird survey Most of habitat of peacocks are in the valleys and valleys of Satpura nandurbar news)

वन विभागाकडून नेमकी संख्या अजून कळली नसली तरी या प्राण्यांचा अधिवास दिसून आल्याने वन्यप्रेमी व प्राणी प्रेमींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी सर्वांच्या सामूदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे.

मेवासी वनविभाग तळोदा यांच्यामार्फत बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. या अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील तळोदा, अक्कलकुवा खापर, मोलगी, वडफळी व काठी अशा सहा वनपरिक्षेत्रात ही प्राणी गणना करण्यात आली.

गणना करण्यासाठी २१ ठिकाणी जंगलात मचाण उभारण्यात आले होते. त्यासाठी ६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून गमन, जामठी, वाल्हेरी राणीपूर, मालदा, काठी, वडफळी, मोकस, मोगरा, जमाना, कुंडवा, सुरगस, मोलगी, मोगराबारी अशा ठिकाणी वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून प्राण्यांचा अधिवास शोधण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

peacock
Nashik News : गणेशवाडी भाजीबाजार इमारत ओस; इमारतीत सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी

कर्मचाऱ्यांना बिबट्या, तरस, अस्वल, कोल्हे, लांडगे, रानडुकरे अशा प्रजातीचे प्राणी दिसून आल्याचे सांगण्यात आले. रात्रभर कोल्ह्यांची कुई कुई तर बिबट्यांची डरकाळी देखील ऐकू आल्याचे सांगण्यात आले. या प्राणी गणनेसाठी तळोदा मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक, सहा वनक्षेत्रांचे वनक्षेत्रपाल, वनपाल व वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मोरांची संख्या लक्षणीय

तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रात मोर प्रजातींच्या पक्षांची संख्या लक्षणीय आढळून आली आहे. मालदा, राणीपूर, वाल्हेरी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोरांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षी प्रेमींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

"बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. विविध ठिकाणी मचाण उभारण्यात आले होते. प्राण्यांची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही. तरी वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, कोल्हे, लांडगे व मोर अशा वन्य प्राण्यांच्या अधिवास दिसून आला आहे. त्यात मोरांची संख्या लक्षणीय आहे." लक्ष्मण पाटील उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग तळोदा

peacock
Success Story : कष्ट, जिद्दीने मिळवला परिस्थितीवर विजय; पोलिस दलात निवड...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com