Board Exam 2023 : परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Board exam

Board Exam 2023 : परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य माध्यमिकउच्च माध्यमिक शिक्षण (Education) मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ पर्यंत उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा, तसेच २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ पर्यंत

माध्यमिक शालान्त परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये (board exam District Magistrate ordered entry ban in 200 meters area of ​​examination center nandurbar news)

यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रवेशबंदीचे आदेशित केले आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात दहावी व बारावीच्या परीक्षेच्या दिवशी सकाळी नऊपासून ते सायंकाळी सहापर्यंत कोणीही प्रवेश करू नये.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

हे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या जवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.