Dhule News : बेपत्ता पुरुषाचा मृतदेह तापी नदीत आढळला

घरातून निघून गेलेल्या पुरुषाचा मृतदेह ७ जानेवारीला सकाळी तापीच्या तरंगताना आढळला.
Ashok wagh
Ashok wagheskal

Dhule News : घरातून निघून गेलेल्या पुरुषाचा मृतदेह ७ जानेवारीला सकाळी तापीच्या तरंगताना आढळला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

अशोक बाबूराव वाघ (वय ५४) असे मृताचे नाव असून, तो मांडळ (ता. शिरपूर) शिवारातील व्यंकटेशनगर येथील रहिवासी होता. काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. ४ जानेवारीला तो राहत्या घरातून निघून गेला होता.

परिसरात व नातलगांकडे शोध घेऊनही त्याचा तपास लागू शकला नाही. ६ जानेवारीला त्याचा मुलगा मयूर वाघ याने दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली. ७ जानेवारीला सकाळी साडेसातला तापी नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांना मृतदेह तरंगताना आढळला.

Ashok wagh
Dhule News : यंदा वरुणराजा रुसल्याने तलावही ‘भेगाळले’; नकाणे तलाव कोरडाठाक

त्यांनी दिलेल्या माहितीवरून, नातलगांनी जाऊन पाहणी केल्यावर मृतदेह अशोक वाघ यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Ashok wagh
Dhule News: धुळ्यात मनपा यंत्रणेकडून मराठा समाजाचे सर्वेक्षण; साडेपाचशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com