Nandurbar News : दुसऱ्या दिवशीही थंडीची हुडहुडी कायम

Winter News
Winter Newsesakal
Updated on

नंदुरबार : दुसऱ्या दिवशीही थंडीचा तडाखा कायम होता. सकाळी दिसणारी सूर्यकिरणे गुरुवारी दिसलीच नाहीत. सकाळपासूनच पावसाळी वातावरण व गार हवा सुरू होती. त्यामुळे थंडीची हुडहुडी कायम होती. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. शाळा-महाविद्यालयांच्या उस्थितीवरही या वातावरणाचा परिणाम जाणवला.

कालपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. अचनाक वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र गारठामय वातावरण आहे. सकाळी तर सूर्यकिरणांचे दर्शनच झाले नाही. अकरानंतर हळूहळू वातावरण निवळले व सूर्यप्रकाश नजरेस पडला. (Cold in nandurbar day to day increase Nandurbar News)

Winter News
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

मात्र वातावणातील गारठा कायम होता. दिवसभर आबालवृद्धांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला, तर काही ठिकाणी दिवसा शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या. पूर्ण हिवाळा संपत आला तरीही कुठे शेकोट्या दिसत नव्हत्या. मात्र ग्रामीण भागात शेकोट्या पेटविलेल्या व त्याभोवती ऊब घेणारे नागरिक गप्पा मारताना दिसून आले.

दरम्यान, अशा वातावरणामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याकडे पाठ फिरविली. गारठा एवढा होता की पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत न जाण्याचा सल्ला दिला. अनेक शाळांमध्ये बस आल्या नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही जाणवला. आजही दिवसभर पारा १९ अंशांवर स्थिर होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Winter News
Nashik News : कामाच्या अनुभवावरून सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार! राज्य शासनाचा निर्णय

बाजारपेठेवरही परिणाम

दरम्यान, या गारठामय वातावरणाचा बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला. ग्रामीण व शहराबाहेरील वसाहतींमधील नागरिक बाजारपेठेत फिरकलेच नाहीत. काही भाजीपाला विक्रेते, हातलॉरीधारक विक्रेते यांनी दुकाने थाटली नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेतही दिसून आला. सर्वत्र गर्दी मंदावली होती.

रोटरी क्लब नंदनगरीची मायेची ऊब

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गरजू व्यक्तींना रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. अशा थंडीत शहरात व परिसरात अनेकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पांघरूण नसते ही बाब लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे जैन सोशल ग्रुपच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी शहरातील गांधी पुतळा, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसर व सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात उघड्यावर असणाऱ्या, पांघरूण नसणाऱ्या गरजू व्यक्तींना शोधून ब्लँकेटवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन आकाश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रितीश बांगड, लिटरसी चेअरमन सय्यद इसरार अली, प्रा. डॉ. राहुल मेघे, फक्रुद्दीन जलगूनवाला, मुर्तूजा वोरा आदी सदस्यांनी सहभाग घेतला..

Winter News
Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com