नवापूर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निकृष्ट 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

नवापूर: उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरच्या दुमजली इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. सदर कामासाठी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरावे असे निर्देश आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

नवापूर: उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरच्या दुमजली इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. सदर कामासाठी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरावे असे निर्देश आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

निकृष्ट बांधकाम 
नवापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात ग्रस्ताना तात्काळ उपचार मिळावा, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक वर्षांपासून होती. अनेक प्रयत्नानंतर ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडे 

पुनवर्सनासाठी हे करताय अजूनही लढा

पंचायत समितीचे माजी सदस्य तथा उपजिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य जालमसिंग गावित व तानाजी वळवी यांनी केली आहे. या तक्रारीवरून आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निर्देश आज दिले आहेत. 

बांधकाम थांबविण्याची मागणी 

उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरच्या दुमजली इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. ट्रामा केअर सेंटर हे अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी उपयोगात आणले जाणार आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू मातीमिश्रित आहे. इमारत दीर्घकाळ सुस्थितीत राहणे आवश्यक आहे. मात्र बांधकामात वापरले जाणारे साहित्य चांगल्या दर्जाचे पाहिजे. यात ठेकेदारांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.

याबाबत आमदार शिरीषकुमार नाईक यांनी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम थांबवण्याची मागणी केली आहे. आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, व क्वालिटी कंट्रोलचे कार्यकारी अभियंता यांना या बांधकामाबाबत पत्र दिले आहे. 

जिल्ह्यातून आठवडाभरात पाच दुचाकीची लांबविल्या

कामाचा फलक नाही 

सदर इमारतीसाठी ३ कोटी २२ लाखाचा निधी मंजूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सदर काम नाशिक येथील गुरुदत्त इन्फ्रास्ट्रक्चर ही संस्था काम करीत आहे. या कामावर साहाय्यक उपअभियंता मयूर वसावे व शाखा अभियंता श्री वाडेकर यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. 
या कामाबाबत तपशीलवार फलक लावलेला नाही. दुमजली इमारतीचा दुसरा मजल्याच्या स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. 
नंदुरबार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of Navapur Trauma Care Center degraded