
Dhule News : कर्ले आरोग्य उपकेंद्र बांधकामात गंभीर चुका; बिल अदा न करण्याचा ग्रामसभेत ठराव
निमगूळ (जि. धुळे) : कर्ले (ता. शिंदखेडा) येथे बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे निकृष्ट (Inferior) दर्जाचे काम सुरू असून, अद्याप काम अंतिम झालेले नसताना प्रवेशद्वारावरचा दोन ठिकाणी स्लॅबचा खालचा भाग निखळायला सुरवात झाली आहे. (Critical mistakes in Curley Health Sub Centre construction Gram Sabha resolution not to pay bill dhule news)
त्यावर डागडुजी करण्यात आली आहे म्हणजे उपकेंद्र सुरू होण्याअगोदर इमारतीची डागडुजी सुरू झाली असून, इमारत किती दिवस टिकेल हे प्रश्नचिन्ह असताना त्या कामाची शहानिशा न करता व कामाची गुणवत्ता न तपासणी करता बिले अदा करण्यात आली आहेत. याबाबत कर्ले ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या कामाची चौकशी जिल्हा परिषद सोडून इतर यंत्रणेकडून करण्यात यावी, ठेकेदाराला बिल अदा करू नये, असा ठरावच ग्रामसभेत केल्याने या कामांकडे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी कर्ले ग्रामस्थांनी केली आहे.
कर्ले गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असून, याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामाच्या गुणवत्तेसह कामाच्या गतीबाबत तक्रार केली होती.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
त्यावर डागडुजी करण्यात आली आहे म्हणजे उपकेंद्र सुरू होण्याअगोदर इमारतीची डागडुजी सुरू झाली असून, इमारत किती दिवस टिकेल हे प्रश्नचिन्ह असताना त्या कामाची शहानिशा न करता व कामाची गुणवत्ता न तपासणी करता बिले अदा करण्यात आली आहेत.
याबाबत कर्ले ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कामाची चौकशी जिल्हा परिषद सोडून इतर यंत्रणेकडून करण्यात यावी, ठेकेदाराला बिल अदा करू नये, असा ठरावच ग्रामसभेत केल्याने या कामांकडे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी कर्ले ग्रामस्थांनी केली आहे.
कर्ले गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असून, याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामाच्या गुणवत्तेसह कामाच्या गतीबाबत तक्रार केली होती.
त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कामावर भेट देऊन कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आदेश केले होते; परंतु उपअभियंता, शाखा अभियंता यांनी गुणवत्ता न तपासता ठेकेदाराला बिल अदा केले असून, त्याची वसुली होण्याची आवश्यकता आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग सोडून इतर यंत्रणेला कामाची गुणवत्ता तपासण्याचे आदेश करावेत, तसेच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी, यापुढे ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत केला आहे. याबाबत अधिकाऱ्यांची कशी चौकशी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.