Dhule Crime : म्हशींची निर्दयतेने वाहतूक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

buffalo
buffalosakal

Dhule Crime : आयशरमधून म्हशींची निर्दयतेने होणारी वाहतूक निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी उजेडात आणली.

या कारवाईत पाच लाखांच्या वाहनासह दीड लाखाच्या १७ म्हशी, असा सहा लाख ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. (Cruel transportation of buffaloes in dhule crime news)

निजामपूर पोलिस ठाण्याचे सुनील अहिरे यांच्या फिर्यादीनुसार २५ ऑगस्टला सकाळी सहाच्या सुमारास शेख मोहम्मद इरफान शेख कादीर व फारूख खान इसा शान (दोघे रा. कमालपुरा, मालेगाव) आयशर (एमएच १८, एए ९८०१) वाहनातून १७ म्हशी निर्दयतेने वाहतूक करताना आढळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

buffalo
Dhule Crime News : इच्छेविरुद्ध गर्भपात करताना युवतीचा मृत्यू; डॉक्टरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

त्यामुळे दोघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अन्य एका कारवाईत निजामपूर शिवारात गुरांची वाहतूक करणारी पिक-अप (एमएच ०५ ईसी ०६२३) अडवण्यात आली.

वाहनातून आखूड दोरीने बांधून गुरांची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी चालक चुनीलाल भदाणे व बन्सी महाले यांच्याविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

buffalo
Dhule Crime : वार्सा फाट्यावर 97 हजारांचा गुटखा जप्त; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com