Dhule Rain : भडणे, तावखेडासह कापडणे परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer and police officer Yuvraj Mali inspecting the fallen corn.

Dhule Rain : भडणे, तावखेडासह कापडणे परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान

कापडणे (जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील भडणे, हतनूर व तावखेडा, तसेच धुळे तालुक्यातील धनूर, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद व कापडणे परिसरात वादळी वाऱ्या‍यासह अवकाळी पावसाने (unseasonal rains) हजेरी लावली. (Damage to crops due to unseasonal rains in Bhadane Tawkheda and Kapadne areas dhule news)

भडणे व तावखेडा परिसरात अधिक, तर कापडणे परिसरात काही अंशी रब्बीचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.

शनिवारी (ता. ४) रात्री दहाच्या सुमारास भडणे व हतनूर तसेच तावखेडा परिसरात वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपले. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, टरबूज, दादर या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला हरभरा, गहू व ज्वारीचे मोठे नुकसान होणार आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

भडणेचे युवा शेतकरी तथा पोलिसपाटील यांनी सांगितले, लहान गारांसह पाऊस झाला. खरिपासह रब्बी हंगामाचेही नुकसान झाले आहे. रात्रभर या अवकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या. शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार असून, अजून दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

दरम्यान, कापडणे परिसरात आज रविवारी (ता. ५) सकाळी सहाला जोरदार वारे वाहत होते. काही मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. रात्रीच्या वादळाने बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गहू आणि मका भुईसपाट झाला.

टॅग्स :DhulerainDamaged Crops