Nandurbar Leopard News : धवळीविहीर येथे आढळला मृत बिबट्या

dead leopard
dead leopardesakal

Nandurbar News : तळोदा वनक्षेत्रातील राजविहीर परिमंडळातील अमोनी वनक्षेत्रांतर्गत धवळीविहीर गावाजवळील एका शेतात सहा महिन्यांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे.

बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Dead leopard found at taloda nandurbar news)

यामुळे परिसरात खळबळ उडत, मृत बिबट्याला पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

तळोदा वनक्षेत्रातील राजविहीर परिमंडळातील अमोनी नियत क्षेत्रातील धवळीविहीर गावातील मजूर मंगळवारी आपली कामे पूर्ण करून गावात परतत होती. त्या वेळी त्यांना रायसिंग वांगऱ्या पावरा यांच्या शेतजमिनीत सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत दिसून आला.

त्यामुळे ते मजूर भयभीत झाले व त्यांनी लागलीच ही बाब शेतमालकाला कळविली. शेतमालकाने याबाबत वन विभागाला कळविले. त्यानुसार तळोदा वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, पशुधन विकास अधिकारी डॉ. विश्वास नवले यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी मृत बिबट्याचे विच्छेदन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dead leopard
Leopard : सहा फूट उंचीची संरक्षण भिंत ओलांडून बिबट्या थेट बंगल्यात

त्यात बिबट्याचे दात, चारही पायांचे पंजे व नखे व कातडी पूर्ण सुस्थितीत आढळून आली. मात्र त्याचे पोट (जठर) पूर्णपणे रिकामे आढळले. त्यामुळे संबंधित बिबट्याचे मृत्यूचे कारण भूक व उपासमारी असण्याची दाट शक्यता पशुधन विकास अधिकारी डॉ. विश्वास नवले यांनी वर्तविली.

शवविच्छेदनानंतर मृत बिबट्यावर तळोदा आगार येथे जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर मृत बिबट्याची राख आग थंड झाल्यानंतर तापी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यात आली.

या वेळी तळोदा वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासू माळी, वनरक्षक जान्या पाडवी, गिरधन पावरा, वीरसिंग पावरा आदी उपस्थित होते. दरम्यान, मृत बिबट्याच्या वैद्यकीय तपासणीमध्ये शवविच्छेदनानंतर त्याला न्यूमोनिया झाल्याचे दिसून येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

"मृत बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय सुमारे सहा महिने होते. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत दिसून आले, मात्र जठर पूर्णपणे रिकामे होते. त्यामुळे भूक व उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे." -डॉ. विश्वास नवले, पशुधन विकास अधिकारी

dead leopard
Leopard Attack News : मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला ‘धोबीपछाड’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com