Dhule News : पीककर्जवाटपाची 90 टक्के वसुली; मार्चअखेरीस 305 कोटी 27 लाख 94 हजार रुपये पीककर्ज भरले

Dhule News : दर वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावीत म्हणून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे खरीप पीककर्ज वाटप केले जाते.
Crop Insurance
Crop Insuranceesakal

म्हसदी : दर वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावीत म्हणून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे खरीप पीककर्ज वाटप केले जाते. गेल्या वर्षी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३२ हजार २५२ शेतकऱ्यांना ३३६ कोटी ७१ लाख ३५ हजार रुपये खरीप पीककर्जवाटप झाले होते. त्यातील २८ हजार ८०९ शेतकऱ्यांनी मार्चअखेरीस ३०५ कोटी २७ लाख ९४ हजार रुपये पीककर्ज भरले आहे. (Dhule 90 percent recovery of crop loan distribution)

यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही ९० टक्के वसुली झाल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून विनाव्याजी कर्ज देणारी सहकारी बँक म्हणून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे पाहिले जात होते; परंतु सुरवातीला बँक व्याज परत करेल या परिपत्रकाप्रमाणे काही शेतकऱ्यांकडून व्याज आकारणी करण्यात आली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी वाढीव व्याजाचा भुर्दंड नको म्हणून हातउसनवारी करत लवकर पीककर्जाचा भरणा केला आहे. नंतर बँकेकडून मात्र व्याज न भरण्याच्या सूचना स्थानिक ठिकाणी देण्यात आल्या. यातून शेतकऱ्यांची एक प्रकारे अडवणूक तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बँक

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. सानुग्रह अनुदानामुळे शेतकऱ्यांना शिस्त लागली आहे. मार्चअखेरीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत ‌विनव्याजी पीककर्ज जिल्हा बँकेतर्फे वितरित केले जाते. यंदा वेळेत कर्जफेडी वाढल्याचा गौरवही बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केला आहे. (latest marathi news)

Crop Insurance
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

आठवड्यात बदलते धोरण

अलीकडे आठवड्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धोरण आठवड्यात बदलते की काय, अशी उपहासात्मक टीका शेतकऱ्यांनी केली आहे. कारण यापूर्वी विनव्याजी कर्ज देणारी एकमेव बँक चक्क यंदा व्याज आकारणी करत असल्याचे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना सूचित करण्यात आले.

अर्थात भरलेले व्याज बँक परतही करेल, असा विश्वासही देण्यात आला. १६ मार्चपर्यंत म्हसदीच्या शाखेत म्हसदीचे १५, तर काकाणी व चिंचखेडा येथील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांनी पीककर्जासह व्याजही भरले आहे. १६ मार्चनंतर मात्र आता व्याज आकारणी न करण्याचा बँकेने फतवा काढला. यातून दर आठवड्याला बँक धोरण बदलत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

वाढीव कर्जपुरवठा करावा

जिल्हा बँकेकडे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी मदत करणारी संस्था म्हणून पाहत असतो; परंतु गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेचे कर्जवाटपाचे धोरण यात मोठी तफावत असून, राष्ट्रीयीकृत बँक व जिल्हा बँक यांच्याकडून हेक्टरी जमिनीनुसार दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत मोठी तफावत आहे.

Crop Insurance
Dhule News : महागड्या किमतीची लोकर कवडीमोल; मागणीअभावी शेतकिनाऱ्याला फेकून देण्याची वेळ

राष्ट्रीय बँकेच्या तुलनेने जिल्हा बँकेकडून कर्ज अगदी तोकडे दिले जाते. परिणामी शेतकऱ्याला आपली हक्काच्या असलेल्या जिल्हा बँक सोडून राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज मागणीसाठी विनवण्या कराव्या लागतात. जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळाने याबाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे कर्जपुरवठा करावा म्हणजे जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांचा पूर्वीप्रमाणे ओघ वाढेल व बँकेस गतवैभव प्राप्त होईल.

"शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन पीकदराप्रमाणे वाढीव कर्जपुरवठा मिळेल. दर वर्षी मार्चअखेरीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे बँकेस गतवैभव प्राप्त झाले आहे. संचालक मंडळाच्या पाठबळावर बँकेत शेतकऱ्यांचे हित साधले जाईल."-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Crop Insurance
Dhule Water Scarcity : जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com