Dhule News : डायल 112 ला प्रतिसाद न देणाऱ्यांचे वाजविले बारा; 4 पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’ला ‘ॲटॅच’

Dhule : पोलिस महासंचालक कार्यालयाचा जनहितासाठी डायल ११२ क्रमांक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
Shrikant Dhiware, Superintendent of Police, Dhule
Shrikant Dhiware, Superintendent of Police, Dhuleesakal

Dhule News : पोलिस महासंचालक कार्यालयाचा जनहितासाठी डायल ११२ क्रमांक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. या सेवेतील कर्तव्यात येथे निष्काळजीपणा केल्याने, वॉकी-टॉकीवरील संदेशास तत्काळ प्रतिसाद न देता बराच विलंब केल्याने संतप्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पवित्रा घेत चार पोलिस निरीक्षकांना ‘कंट्रोल रूम’ला ‘ॲटॅच’ केले, तर तीन हवालदारांना तडकाफडकी निलंबित केले.

या कारवाईतून जिल्हा पोलिस दलात या सेवेबाबत, कर्तव्यात गांभीर्य न राखणाऱ्यांचे बारा वाजतील, असा संदेश दिला गेला आहे. (Action against police who not respond to dial 112)

राज्यात सर्वत्र नागरिकांना आपत्कालीन स्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी आणि जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी डायल ११२ हा क्रमांक कार्यान्वित आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास तो कॉल कोठून करण्यात आला हे समजते. त्यामुळे संबंधिताला तत्काळ मदतीसाठी कार्यवाही सुरू केली जाते.

अशी आहे सेवा

डायल ११२ हेल्पलाइनचा मुख्य नियंत्रण कक्ष नवी मुंबईत आणि नागपूर येथे आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातही सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत एखाद्या व्यक्तीने ११२ क्रमाकांवर संपर्क साधत पोलिसांची मदत मागितल्यास त्याला नवी मुंबईतील नियंत्रण कक्षातून प्रथम प्रतिसाद दिला जातो.

नवी मुंबईतील केंद्रातून संबंधित व्यक्तीचे ‘लोकेशन’ तपासून तो फोन तत्काळ संबंधित शहराच्या पोलिस नियंत्रण कक्षाला जोडला जातो. संबंधित नियंत्रण कक्षातून त्या व्यक्तीच्या जवळपास असणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण करण्यास सांगितले जाते. मदत करताना पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मदतीनंतर संबंधित व्यक्तीकडून ‘फीडबॅक’देखील घेतला जातो.

धुळे शेवटच्या क्रमांकावर

डायल ११२ मध्ये जानेवारीत धुळे जिल्हा महाराष्ट्रात शेवटच्या क्रमांकावर आला आहे. ते लक्षात येताच पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील या सेवेसंदर्भात कर्तव्यतेत सुधारणा व्हावी यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. तरीही काही पोलिस ठाण्यांमध्ये सुधारणा होताना दिसत नव्हती.

Shrikant Dhiware, Superintendent of Police, Dhule
Dhule Crime News : जावयासह सासऱ्याला ‘एलसीबी’च्या बेड्या; जबरी चोरी प्रकरण

वास्तविक, जनतेसाठी ही चांगली योजना आणि मदत कमीत कमी कालावधीत पोचावी यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय धडपडत असताना धुळे जिल्ह्यात या सेवेसंदर्भात देण्यात आलेले यंत्र-साधन रात्री-पहाटे बंद ठेवणे, चार्जिंग न करणे आदी गंभीर प्रकार तपासणीत समोर आले. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या सेवेच्या कर्तव्यतेत सुधारणा घडून राज्यात चांगल्या क्रमवारीत स्थान पटकावण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी कारवाईचा गुरुवारी (ता. २२) कठोर पवित्रा घेतला.

सात जणांवर कारवाई

निष्काळजीपणाबाबत धुळे शहर पोलिस ठाण्यातील हवालदार हिमांशू ठाकरे, निजामपूर पोलिस ठाण्यातील हवालदार सुनील अहिरे, कृष्णा भिल या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. धुळे शहराचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, दोंडाईचाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे,

निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हनुमंतराव गायकवाड यांना ‘कंट्रोल रूम’ला ‘ॲटॅच’ करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत चारही पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल रूम’ला ‘ॲटॅच’ राहतील. सेवा, कर्तव्याबाबत शिस्तीचा पाठ गिरविणारे पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या कारवाईमुळे दलात खळबळ उडाली आहे, तर जनतेतून स्वागत होत आहे.

"डायल ११२ या क्रमांकाबाबत, मदतीबाबत नेमकी कार्यवाही कशी व्हावी, यासाठी सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, उपअधीक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. संदेश प्राप्त झाल्यानंतर मदतस्थळी तत्काळ पोचणे महत्त्वाचे आहे. त्यात स्थिती, प्रसंगानुसार कुणाला अटकच केली पाहिजे, ताब्यात घेतले पाहिजे, असे अभिप्रेत नाही. आपण काय नेमकी कार्यवाही केली, मदत पोचवली याचा तत्काळ ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने दिला पाहिजे."-श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे

Shrikant Dhiware, Superintendent of Police, Dhule
Dhule News : रानडुकरांकडून शेवगा पिकासह ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी; शेतकऱ्यांची तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com