Dhule Municipality News : पाणीपुरवठा योजना, सावरकर स्मारकाला मंजुरी; चौकाचौकांत सोलर ब्लिंकर्स

Dhule Municipality : स्ट्रीट लाइट, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक विकसित करणे आदी विविध कोट्यवधी रुपयांच्या कामाला स्थायी समितीच्या प्रशासकीय समितीने मंजुरी दिली.
Engineer Kailas Shinde speaking in municipal standing committee administrative meeting.
Engineer Kailas Shinde speaking in municipal standing committee administrative meeting.esakal

Dhule Municipality News : केंद्र, राज्य पुरस्कृत अमृत-२.० अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या स्थापत्य काम, मनपा दवाखाने, वलवाडी फिल्ट्रेशन प्लांट येथे ऑन ग्रिड सोलर सिस्टिम, पाणीपुरवठा केंद्र उद्यान, अमरधाम येथे सोलर हायमास्ट, शहरातील मुख्य चौक, शाळा-महाविद्यालय चौकात सोलर ब्लिंकर्स, चौपाटी येथील गार्डन येथे विद्युतीकरण, स्ट्रीट लाइट, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक विकसित करणे आदी विविध कोट्यवधी रुपयांच्या कामाला स्थायी समितीच्या प्रशासकीय समितीने मंजुरी दिली.

महापालिका स्थायी प्रशासकीय सभा गुरुवारी (ता. २२) दुपारी बाराला महापालिका सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अमृत-२.० अंतर्गत धुळे पाणीपुरवठा योजना स्थापत्य कामासाठी ११८.१४ कोटी रुपये किमतीची निविदा काढण्यात आली होती.

निविदाप्रक्रियेत मे. जयदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. धुळे, मे. प्रगती कन्स्ट्रक्शन, लातूर व लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा.लि. अशा तीन निविदा प्राप्त झाल्या. यातील मे. जयदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (शेकडा १५ टक्के जास्त) दराची मात्र सर्वांत कमी दराची निविदा प्राप्त होती.

वाटाघाटीअंती १४.५० टक्के जादा दराने काम करण्याची तयार कंपनीने दाखविली. सध्याचे बाजारभाव दर पाहता हे दर योग्य असल्याचा अभिप्राय धुळे महापालिकेच्या अभियंत्यांनी दिला. त्यानुसार निविदा मंजूर करण्यात आली. शासनाच्या कमिटीकडे तसा ठराव पाठवावा लागणार आहे. कमिटीने मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. या योजनेंतर्गत विशेषतः हद्दवाढ भागात जलकुंभ, जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे.

या कामांना मंजुरी

माझी वसुंधरा-३.० अंतर्गत मनपाच्या विविध दवाखान्यांत १० केव्हीपी, वलवाडी फिल्ट्रेशन प्लांट येथे १० केव्हीपीचे ऑन ग्रिड सोलर सिस्टिम बसविण्यासाठी ७७ लाख आठ हजार ९४ रुपये खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली. यासाठी प्रयास इलेक्ट्रोसिस्टम्स, ठाणे यांची अंदाजपत्रकीय निविदा होती, त्यांना हे काम देण्यात आले.

Engineer Kailas Shinde speaking in municipal standing committee administrative meeting.
Dhule News : डायल 112 ला प्रतिसाद न देणाऱ्यांचे वाजविले बारा; 4 पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’ला ‘ॲटॅच’

पाणीपुरवठा केंद्र, उद्यान, अमरधाम येथे सोलर हायमास्ट बसविणे तसेच मुख्य जंक्शन, शाळा, महाविद्यालय, चौकात सोलर ब्लिंकर्स बसविण्यासाठी प्राप्त अंदाजपत्रकीय दराची पंडित इलेक्ट्रिकल्स, धुळे यांची निविदा मंजूर करण्यात आली. एक कोटी ३२ लाख ९७ हजार ६१९ रुपये खर्चाचे हे काम आहे.

अल्पसंख्याक क्षेत्रविकास कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत प्रभाग १३ मध्ये १ ते ५ कामांसाठी ९९ लाख ६६ हजार ५९० रुपये खर्चाचे काम जयेश सतीश मगर या निविदाधारकाला देण्यास मंजुरी मिळाली. त्यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा होती.

तसेच याच योजनेंतर्गत प्रभाग ३ मध्ये वीटभट्टी व अल्पसंख्याक परिसरात पथदीप, हायमास्टचे काम मंजूर करण्यात आले. २९ लाख ९९ हजार ६५ रुपये खर्चाचे हे काम मे. बिजासनी एंटरप्राइजेसला मिळाले. पांझरा चौपाटी येथील गार्डन येथील विद्युत कामासाठी ७१ लाख ९२ हजार ७२५ रुपये खर्चाच्या कामासाठी रेडियन्स इलेक्ट्रिकल्स धुळे यांची निविदा मंजूर झाली.

एक कोटीतून सावरकर स्मारक

विकास शुल्क निधीतून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक विकसित करण्यासाठी रामेश्‍वर ट्रेडर्स यांची सर्वांत कमी (०.९९ टक्के कमी) दराची निविदा मंजूर करण्यात आली. ९९ लाख ८७२ रुपये खर्चातून हे काम होणार आहे. आर्किटेक्टच्या संकल्प चित्रानुसार हे काम करावे लागणार आहे.

Engineer Kailas Shinde speaking in municipal standing committee administrative meeting.
Dhule News : रानडुकरांकडून शेवगा पिकासह ठिबकच्या नळ्या, ड्रिपरची नासाडी; शेतकऱ्यांची तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com