Agniveer Bharati : धुळे, नंदुरबारसह 8 जिल्ह्यांतील तरुणांसाठी ‘अग्निवीर’ भरती! इच्छुक तरुणांनी येथे करावी नोंदणी

Dhule : भारतीय सैन्य भरती (अग्निवीर एंट्री) २०२४-२०२५ साठी पात्र पुरुष उमेदवारांसाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
Agniveer
Agniveeresakal

Dhule News : भारतीय सैन्य भरती (अग्निवीर एंट्री) २०२४-२०२५ साठी पात्र पुरुष उमेदवारांसाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन नोंदणी २२ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. अशी माहिती संचालक (भरती) कर्नल विक्रम सिंग यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. (Dhule Nandurbar Agniveer Bharati)

भरती वर्ष २०२४-२५ साठी अग्निवीरांची भरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. टप्पा एक (ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा) आणि दुसरा टप्पा (भरती रॅली उमेदवाराची चाचणी, कागदपत्रे तपासणी, वैद्यकीय तपासणी) याप्रमाणे राहील. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक, स्टोअर किपर टेक्निकल.

अग्निवीर ट्रेड्समन (दहावी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन (आठवी पास) या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यांचे रहिवासी (अधिवास) असलेल्या उमेदवारांसाठी होणार आहे. (latest marathi news)

Agniveer
Dhule News : ‘सीईओं’विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर; जिल्हा परिषद सभेत सर्वपक्षीय सदस्यांची एकजूट

उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. जे उमेदवार यशस्वीरीत्या ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करतील त्यांची प्रवेशपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहेत.

ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (ऑनलाइन CEE) महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार घेतली जाईल. २२ एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

Agniveer
Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com