Dhule Crime : वेळीच सिग्नल मिळाल्याने 30 लाख रुपये सुरक्षित! शिरपूरला गॅस कटरने ATMसह बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

Crime News : ... काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी धूम ठोकली आणि स्टेट बँकेच्या एटीएममधील ३० लाख रुपयांची रोकड सहीसलामत राहिली.
Officials inspecting an ATM in Rasiklal Patel Nagar. ATM center closed after incident
Officials inspecting an ATM in Rasiklal Patel Nagar. ATM center closed after incidentesakal

शिरपूर : गॅस कटरने संशयित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथील अलार्म सिस्टमने मुंबईच्या कार्यालयात सिग्नल दिला. तेथून शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी धूम ठोकली आणि स्टेट बँकेच्या एटीएममधील ३० लाख रुपयांची रोकड सहीसलामत राहिली. दुसऱ्‍या घटनेत शहराच्या मेनरोडवरील बँक ऑफ इंडिया शाखेचे सेंट्रल लॉक उघडण्यात संशयितांना अपयश आल्याने तेथील चोरीही अयशस्वी ठरली. (Dhule Crime 30 lakh rupees secured by getting signal on time)

शहरातील रसिकलाल पटेल नगरमधील खासगी व्यापारी संकुलात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी ते २४ तास खुले ठेवले जाते. ३० जूनला मध्यरात्री तीनच्या सुमारास दोन संशयित तेथे पोचले. त्यांनी एटीएम मशिनचा पहिला लोखंडी दरवाजा तोडला. त्यानंतर कॅश बॉक्सला गॅस कटरने कापून रोकड काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या केंद्रातील अलार्म सिस्टमने चोरीच्या प्रयत्नाबाबत मुंबई येथील हिताची पेमेंट सर्व्हिस प्रा.लि.च्या कार्यालयात सिग्नल दिला. तेथील अधिकाऱ्‍यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी येण्यास निघाले. दरम्यान मशिनसोबत तासभर झटापट करूनही यश मिळत नसल्याने व काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने संशयितांनी तेथून पळ काढला.

या कृत्यात दोन संशयित सहभागी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. एटीएम सेंटरमध्ये शिरताच एकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यावर कलर स्प्रे मारल्याचे निष्पन्न झाले. हिताची कंपनीचे प्रतिनिधी नितीन पाठक यांनी पाहणी केली असता कॅश बोर्डमधील ३० लाख रुपयांची रोकड सुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला. (latest marathi news)

Officials inspecting an ATM in Rasiklal Patel Nagar. ATM center closed after incident
Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

बँकही बचावली

शहरातील मेनरोडवरील व्यापारी संकुलात वरच्या मजल्यावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. संशयिताने तेथील शटरची दोन कुलपे इलेक्ट्रिक कटरने कापून काढली. मात्र शटरला सेंट्रल लॉक असल्यामुळे शटर उघडण्यात त्याला अपयश आले. दरम्यान, पोलिस गस्तीचे वाहन दोन-तीनदा तेथून गेल्याने चोरीचा प्रयत्न सोडून त्याने पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कटर चालवण्यासाठी त्याने संकुलातील एका वीजपुरवठा मीटरमध्ये वायर टाकल्याचे उघड झाले. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्‍या एका संशयिताचे फुटेज सार्वजनिक करून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षारक्षक नाहीत

शहरातील सहकारी बँकांच्या एटीएम सेंटरचा अपवाद वगळता अन्यत्र सुरक्षारक्षक नेमले नसल्याचे दिसून आले आहे. शिरपूर पीपल्स बँक आणि हस्ती बँक यांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक आहेत. काही बँका त्यांच्या कार्यालयीन वेळेपुरताच एटीएम सुरु ठेवतात. त्यांची सर्व भिस्त सीसीटीव्ही आणि अलार्म यंत्रणेवर आहे. याबाबत पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव आहे.

Officials inspecting an ATM in Rasiklal Patel Nagar. ATM center closed after incident
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com