Dhule Crime News : चोरट्याकडून 4 दुचाकी जप्त

Dhule Crime News : दुचाकी चोराला एका चोरी प्रकरणात पकडल्यानंतर पोलिस कोठडीत त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली, तर घराच्या झडतीत गुंगीकारक औषधांच्या बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
Police officers and employees present during inspection of seized two-wheeler.
Police officers and employees present during inspection of seized two-wheeler.esakal

Dhule News : दुचाकी चोराला एका चोरी प्रकरणात पकडल्यानंतर पोलिस कोठडीत त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली, तर घराच्या झडतीत गुंगीकारक औषधांच्या बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पेश भटूलाल दुधावत यांची दुचाकी (एमएच १८, एजी ११२२) चोरट्यांनी लंपास केली. तशी फिर्याद दाखल झाली. (Dhule crime 4 bikes seized from thief)

सहाय्यक पोलिस अधिकारी जीवन बोरसे यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने रेहान शेख फरीद शेख (वय १८, रा. आझादनगर, वडजाई रोड) याला सापळा रचून अटक केली. पोलिस कोठडीत त्याने चार मोटारसायकली चोरल्याची कबुली देत त्या दुचाकी पंचनाम्यात काढूनही दिल्या.

चोरीच्या दुचाकींची चावी शोधण्यात आली. पोलिस पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता पलंगाखाली गुंगीकारक औषधाच्या वीस बाटल्या आढळल्या. पोलिसांनी सुमारे एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Police officers and employees present during inspection of seized two-wheeler.
Nagpur Crime: नागपूर फोटोग्राफर खून प्रकरण, गोळ्या झाडणारा बंगळूरचा? बंदुकीला सायलेन्सर लावून केली होती हत्या

संशयित रेहान शेख याच्याविरोधात शहर आणि चाळीसगाव रोड पेालिस ठाण्यात पूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी जीवन बोरसे.

उपनिरीक्षक विनोद पवार, डोमदेव गवार, अविनाश वाघ, मनोज पाटील, संजय धनगर, रवींद्र ठाकूर, सुनील पाथरवट, विनोद पाठक, अतिक शेख, शोएब बेग, देवेंद्र तायडे, माधुरी हटकर, विशाल गायकवाड यांच्या पथकाने केली.

Police officers and employees present during inspection of seized two-wheeler.
Crime News: भावानेच केला भावावर हल्ला; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com