Dhule Crime News : टोलप्लाझा कर्मचाऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत

Dhule Crime : मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या टोलप्लाझा कर्मचाऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत तरंगताना बुधवारी (ता. २७) सायंकाळी आढळला.
Sagar Gosavi
Sagar Gosaviesakal

सोनगीर : येथील मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या टोलप्लाझा कर्मचाऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत तरंगताना बुधवारी (ता. २७) सायंकाळी आढळला. सागर भटूगीर गोसावी (वय २७, रा. डांगुर्णे, ता. शिंदखेडा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, तो टोलप्लाझावर ऑफिसबॉय म्हणून कामावर होता. पाण्याची टाकी टोलप्लाझाच्या क्षेत्रातच आहे. तो सकाळी कामावर आला पण थोड्या वेळानंतर कुणालाही दिसून न आल्याने त्याची शोधाशोध सुरू होती. (Dhule Crime Body of toll plaza employee in water tank)

पाय घसरून तो पाण्याच्या टाकीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. युवकाच्या निधनाने डांगुर्णे गावावर शोककळा पसरली. सागर गोसावी टोलप्लाझाच्या उद्‍घाटनापासून कार्यालयात शिपाई म्हणून कामाला होता. तो बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आला.

पण थोड्या वेळातच कार्यालयात कामासाठी त्याची गरज भासल्याने शोधाशोध सुरू झाली. पण तो कुणालाही दिसून आला नाही. सायंकाळी टोलप्लाझा कार्यालयाच्या मागील पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. सोनगीर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

Sagar Gosavi
South Africa Bus Accident: दक्षिण आफ्रिकेत बस पुलावरून दरीत कोसळली; ४६ प्रवाशांपैकी ४५ जण ठार

उपस्थितांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृताचे नातलग व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात व ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. गुरुवारी (ता. २८) दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.

कुटुंबाचा आधार

सागर हा लहान असतानाच त्याच्या आईची छत्रछाया हरपली. वडील भटूगीर वामनगीर गोसावी व भाऊ धनंजय यांचा त्याने सांभाळ केला. कामावरून आल्यावर तो स्वयंपाकासह घरची कामे करायचा. धनंजयला शिकवले व एका खासगी कंपनीत नोकरीस लावले. सागर अविवाहित होता. त्याच्या मृत्यूने अवघ्या गावाला धक्का बसला आहे. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Sagar Gosavi
Crime News: संभाजीनगर हादरलं! बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याची भयानक शिक्षा, डोक्यावर चार वेळा बोलेरो घालून केली हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com