Dhule Crime News : पावणेपाच कोटींचे आर्थिक शोषण; मुख्य संशयिताला सुरतहून बेड्या

Dhule Crime : जिल्ह्यातील ठेवीदारांचे सुमारे पावणेपाच कोटींच्या आर्थिक शोषणाद्वारे फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत (गुजरात) येथून अटक केली
crime
crime esakal

Dhule Crime News : जिल्ह्यातील ठेवीदारांचे सुमारे पावणेपाच कोटींच्या आर्थिक शोषणाद्वारे फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत (गुजरात) येथून अटक केली. त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दोन वर्षांपासून तो फरारी होता. शुकूल ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून मुख्य संशयित प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना विद्याधर शुक्ला (वय ४६) तसेच धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल (सर्व रा. सुरत, गुजरात) यांनी पूर्वनियोजित कट रचून शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाउंडर, डेलीगेट या फर्मची स्थापना केली. (Financial exploitation of 55 crore main suspect arrested from Surat )

संशयित मंगेश नारायण पाटील व आकाश मंगेश पाटील (दोन्ही रा. १, जयहिंद कॉलनी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांच्यामार्फत स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी कंपनीची जाहिरात करून त्यांच्या फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास प्रतिमहिना ८ ते ९ टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले.

गुजराती चित्रपट बनविले

पीडित ठेवीदारांकडून गुंतवणुकीची रक्कम स्वीकारून तक्रारदार व ठेवीदारांच्या गुंतवणुकीचे परतावे परत न करता त्या पैशांतून चार ते पाच गुजराती चित्रपट बनविले. तसेच ठेवीदारांना वेळोवेळी खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांचे सुमारे चार कोटी ७२ लाख ५० हजारांचे आर्थिक शोषण केले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणातील मुख्य संशयित तथा कंपनीमालक प्रदीप विद्याधर शुक्ला गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता. त्याने धुळे सत्र न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केले. (latest marathi news)

crime
Dhule Crime News : अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई

पोलिसांचा विशेष अहवाल

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य संशयिताचा अटकपूर्व जामीन रद्द होण्याबाबतचा विशेष अहवाल सादर झाला. त्यावरून मुख्य संशयित प्रदीप शुक्ला याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्याच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखचे पथक सुरत येथील पोलिसांच्या संपर्कात होते. दोन वर्षांपासून फरारी प्रदीप ऊर्फ मुन्ना शुक्ला याला ३ मेस सुरत येथून अटक केली.

त्याला धुळे येथे विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, अमित माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, हिरालाल ठाकरे, गयासुद्दीन शेख, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भूलथापांना बळी पडू नये : धिवरे

आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कोणत्याही खासगी कपंनी अथवा मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपन्या तसेच गुंतवणुकीच्या कंपनीचे संचालक मंडळ, कंपनीचे प्रतिनिधी, एजंट, प्रोमोटर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर आहे. या योजनेत आर्थिक फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी त्यांच्याकडे उपलब्ध दस्तऐवज, पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखेत तपास अधिकाऱ्यांना भेटावे. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक धिवरे यांनी केले.

crime
Dhule Crime News : डांगरी येथे तिघांवर चाकू हल्ला; संशयिताला न्यायालयीन कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com