Dhule Crime: 15 दुचाकी, 6 जलपरी चोरणाऱ्या टोळीतील 7 जणांना एलसीबीकडून अटक! सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : पथकातील पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील सात जणांना बेड्या ठोकत सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
A team of LCB along with senior police officers were present during the inspection of the stolen goods.
A team of LCB along with senior police officers were present during the inspection of the stolen goods. esakal
Updated on

Dhule Crime : पंधरा दुचाकी आणि सहा जलपरी चोरणाऱ्या टोळीला एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने कारवाईतून दणका दिला. पथकातील पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील सात जणांना बेड्या ठोकत सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Dhule Crime LCB arrested 7 people who stole 15 bikes 6 watermotors)

शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाईची सूचना दिली. त्यानुसार निरीक्षक पवार यांनी माहितीचे संकलन केले.

कावठी (ता.धुळे) येथील सुदाम ठाकरे व त्याच्या साथीदारांनी दुचाकी लंपास केल्याची माहिती श्री. पवार यांना मिळाली. याआधारे त्यांनी पोलिस पथकाच्या मदतीने सुदाम ठाकरे, प्रमोद दगडू पिंपळे, रामदास तुकाराम पिंपळे, सतीश पिंपळे, दीपक सुरेश सोनवणे, प्रेमराज ज्ञानेश्‍वर शिंदे (सर्व रा. कावठी) व महम्मद इरफान महम्मद आतिक यांना बेड्या ठोकल्या. (latest marathi news)

A team of LCB along with senior police officers were present during the inspection of the stolen goods.
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

त्यांच्याकडून चोरीच्या पंधरा दुचाकी, बॅटरी, सहा जलपरी, असा चार लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीच्या घटना या धुळे तालुका, सोनगीर, निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत घडल्या आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात श्री. पवार, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, आघाव, हवालदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, संजय सुरशे, राजीव गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

A team of LCB along with senior police officers were present during the inspection of the stolen goods.
Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com