Dhule District Collector : साक्री तालुक्यात 5 ते 7 मेदरम्यान मद्यविक्रीस बंदी!

Dhule News : संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहेत.
Dhule District Collector
Dhule District Collector esakal

Dhule News : गुजरातमधील वलसाड व बारडोली लोकसभा मतदारसंघात ७ मेस मतदान होणार असल्यामुळे संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका गुजरातच्या सीमेला लागून आहे, तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्चविषयक बाबींच्या अनुषंगाने संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. (Dhule District Collector)

त्यामुळे या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या साक्री तालुक्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या ४८ तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवणे आवश्यक आहेत.

अनुज्ञप्ती बंदचे क्षेत्र

धुळे जिल्ह्यातील संपूर्ण साक्री तालुक्यात ५ मेच्या सायंकाळी सहापासून पुढे ६ मेला पूर्ण दिवस, तसेच ७ मेस सायंकाळी सहापर्यंत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. या कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारकांनी या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. (Latest Marathi News)

Dhule District Collector
Dhule Crime News : पोलिसांवर हल्ला प्रकरणी जमावावर गुन्हा!

मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.

Dhule District Collector
Dhule Drought News : यंदा 1972 च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी; चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com