Dhule Summer Heat : धुळ्यात भाजीपाल्याचे दर शंभरीला! टंचाईमुळे आवक कमी

Summer Heat : जीवनावश्यक वस्तू, धान्य व कडधान्याच्या महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे. परिणामी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
vegetables
vegetablesesakal

Dhule Summer Heat : जीवनावश्यक वस्तू, धान्य व कडधान्याच्या महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे. परिणामी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अत्यल्प पावसामुळे यंदा आवक कमी झाल्याने भाजीपाल्याने दरात शंभरी गाठली आहे. त्यामुळे गृहिणींना घरघुती बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. तसे पाहिल्यास घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्यांचे दर दुप्पट आणि तिप्पट असतात. त्यामुळे काही ग्राहकांनी कॉटन मार्केटकडे धाव घेतली आहे. ( due to low rainfall prices of vegetables has reached 100 rupees)

उन्हाचा तडाखा वाढत असताना भाजीपाल्याच्या किमतीही तापायला सुरवात होते. वाढत्या भाजीपाल्याच्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगळी झळ बसते. उन्हाळ्यात अधिक तापमान असल्यामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात विजेच्या पुरवठ्यात अनियमितता, त्यामुळे भाजीपाला स्टोअर करून ठेवता येत नाही. उन्हाळ्यात अधिक तापमान असल्यामुळे लिंबू, टोमॅटो, मटर, पालक, मेथी या भाजीपाल्यास अधिक मागणी असते. कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती नियंत्रणात आहेत. तुलनेत किरकोळमध्ये दोन-तीन पटींनी वाढ झाली आहे.

७० टक्के आवक

सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची सरासरी ७० टक्के आवक आहे. वाढलेल्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. दर वर्षी एप्रिल आणि मेमध्ये भाज्यांचे दर गगनाला पोचतात. टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह नाशिक येथून, तर सिमला मिरची, पडवळ, कारले, तोंडले साक्री, धुळे आणि शिरपूर तालुक्यातून विक्रीला येतात. अत्यल्प पाऊस आणि पाणीटंचाईमुळे भाज्यांची दरवाढ झाल्याचे कारण किरकोळ विक्रेते देत आहेत. भाज्या शेतातच खराब झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पावसाने यंदा चांगली हजेरी लावली तर भाज्यांचे दर निश्‍चित नियंत्रणात येऊ शकतील. (latest marathi news)

vegetables
Dhule Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेने प्राण्यांच्या जिवाचीही‌ काहिली

भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो)

* काकडी..............६०

* टोमॅटो................६०

* हिरवी मिरची.......६०

* कैरी................६५

* गवार शेंग.........८०

* फुलकोबी.........८०

* पत्ताकोबी.........८०

* चवळी शेंग........८०

* वांगे..................८०

* कारले..............८०

* पालक..............१००

* मेथी.................१००

* कोथिंबीर............१००

* भेंडी.................१००

''वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे जितकी मागणी आहे, तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढत्या आहेत. उन्हामध्ये भाजीपाला स्टोअर करून ठेवणे अवघड जाते. तापमान कमी होईल तसे भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येतील.''-गजानन शिंदे, भाजीपाला व्यापारी, मार्केट यार्ड, धुळे

vegetables
Dhule Summer Heat : ‘एप्रिल’चा तडाखा ‘मे’मध्येही कायम! धुळ्यातील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com